विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथे शिवसेना – युवासेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सेना भवन येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख प्रभाकर दयालराव काळे,शहर प्रमुख संतोष बोडखे,कृष्णा राऊत,रमेश गव्हांडे,भगवान इंगळे,अशोक खेडकर,विजय बिर्ला,भगवान वारंगणे,विक्रम चौधरी, नगरसेवक अक्षय काळे,रौफ शेख,दीपक पगारे,हर्षल काळे,किशोर मापारी,राजु दुतोंडे,भगवान जोहरे,गजानन माळी, मंगेश सोहनी,शेख बबलू,संदीप चौधरी,लतीफ शाह,भगवान बावसकर,राजू गव्हाड,अनिल ठाकरे,श्याम चौधरी,भगवान वाघ,राजू माळी, राजेश सोनवणे,शरीफ शाह,सिकंदर तडवी,कलीम पठाण,झाकीर देशमुख,जितेश चनाल,सिकंदर पठाण,जवरलाल चव्हाण आदींची उपस्थिती होती.
Author: saimat team
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सर्वत्रच सध्या थंडीची लाट आठ दिवसांपासून वाढत चालल्यामुळे लहान मोठ्यासह चिमुकल्यांनाही सर्दी, पडसे, घशाचे विकार व थंडी तापाच्या रुग्णांमध्ये सोयगाव तालुक्यातील गावोगावी झपाट्याने वाढ होत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पुन्हा एकदा सतर्क राहावे लागेल. वातावरणातील चढउतारामुळे सर्वत्र रुग्ण धास्तावले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मागील महिन्यात थंडीची सौम्य लाट होती. ती आता गेल्या आठ दिवसांपासून पासून उच्चांकच गाठताना दिसते. त्याचा शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होताना दिसतो. पहाटे पहाटे धुके पडणे, ढगाळ वातावरण तयार होणे, सूर्यदर्शन न होणे झाले तर ते अति तीव्र असणे यामुळे लहान बालक व वृद्धांना या…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत केवळ १५ मतांनी तीन जागा जिंकलेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना माझ्याविरोधात निवडणूक लढविण्याची भाषा करण्याचा नैतिक अधिकार नाही सोयगावात भाजप भक्कमच आहे सोयगाव भाजपचाच बालेकिल्ला आहे १५ मते पडली नसती तर चणे – फुटाणे खिशात घेऊन फिरणाऱ्या सत्तारची काय अवस्था झाली असती , हे मी सांगायला नको , असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली . सोयगाव नगरपंचायतीच्या निकालानंतर सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती . याच अनुषंगाने बनोटीत एका खासगी कार्यक्रमात दानवे यांनी सत्तारांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले . सोयगाव नगरपंचायत शिवसेनेने…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,५२० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,५३० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,५२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
जळगाव, प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त युवासेना जळगाव महानगर तर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन रविवार व सोमवार दिनांक २३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, जळगाव येथे सकाळी १० सायंकाळी ५ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी शिबिराचे उदघाटन युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांकडून पुष्पांजली वाहण्यात आली. या वेळी युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, उपमहानगरप्रमुख गिरीश सपकाळे, विभाग प्रमुख अमोल मोरे, प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, पंकज नाले,…
चोपडा, प्रतिनिधी । सातशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जे का रंजले – गांजले , त्यासी म्हणे जो आपुले…असे सांगून निस्वार्थ समाजसेवेची शिकवण दिली .रोटरी क्लब हि संस्था आणि त्यांचे सदस्य खऱ्या अर्थाने या निस्वार्थी सेवेचे मोल जोपासत , समाजाला प्रेम आणि विश्वास देत सेवाभावी वृत्तीचे विधायक असे सामाजिक कार्य करीत आहेत असे गौरवोद्गार चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी काढले. ते रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित चोपडा शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधवांसाठी मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिर प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पोलिस दलात कमी मनुष्यबळ , त्यात २४…
जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील धरणगाव येथील बनावट असलेली देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क च्या भरारी पथकाने धाड टाकून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट देशी दारूची निर्मिती करणार्या कारखान्यावर छापा मारून ११ लाख रूपयांचा ऐवज जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला धरणगाव येथे बनावट मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार जिल्हा अधिक्षीका सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच. पाटील यांनी पथकाची नियुक्ती केली. या पथकात दुय्यम निरिक्षक ए. एस.…
मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर ११०.५६ ९३.३१ अकोला १०९.७४ ९२.५५ अमरावती १११.५५ ९५.७४ औरंगाबाद ११०.०४ ९२.८२ भंडारा ११०.७२ ९३.५० बीड १११.६२ ९४.३५ बुलढाणा ११०.४४ ९३.२३ चंद्रपूर १०९.८० ९२.६३ धुळे १०९.७४ ९२.५४ गडचिरोली ११०.६३ ९३.४२ गोंदिया १११.२५…
मुंबई, वृत्तसंस्था । हॅकर असलेल्या श्रेयस गुजर या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि असुरक्षितता दाखवून दिल्या आहेत. विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून लाखो विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षा या संदर्भातील संवेदनशील विदा असुरक्षित असल्याची विद्यापीठाला माहिती करून दिली असून, आता संपूर्ण प्रणालीतील त्रुटी दूर करून प्रणाली सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलली जाणे आवश्यक आहे. श्रेयस गुजर फर्ग्युसन महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तो प्रमाणित एथिकल हॅकरही आहे. त्याने यापूर्वी विविध कंपन्या आणि केंद्र सरकारसाठीही काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रणालीत त्रुटी असल्याचे त्याला जून २०२१मध्ये लक्षात आले होते. त्यानुसार त्याने कुलगुरूंचे प्रणालीतील खाते हॅक करून ई-मेलद्वारे…
मुंबई, वृत्तसंस्था । गोवंडी शिवाजी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. कॅटरिंगच्या कामावरून ही मुलगी घरी परतत होती. या वेळी या टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करून पळ काढला. मुलीने बाहेर येऊन आरडा ओरडा केल्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले…