विजय चौधरी-सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यात आज 512 जणांना (मनपा 338, ग्रामीण 174) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 149 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 58 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 671 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (758) घाटी परिसर 6, कॅन्सर हॉस्पीटल परिसर 1, आर्मी कॅम्प छावणी परिसर 7, संजय नगर 1, भावसिंगपुरा 1, नंदनवन कॉलनी 5, उस्मानपूरा 6,…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब आकार/शुल्क माफीच्या सवलतीची अभय योजना जाहीर झाली असून ही योजना आजपासून राज्यात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचे शासन परिपत्रकही पाणीपुरवठा विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात आजपासून अभय योजनेला सुरुवात होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंबाचा आकार, दंड, व्याज यात पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी टप्प्या-टप्प्याने पैसे भरावे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान पाणीपुरवठा केंद्राच्या मागणीच्या आधारावर ही योजना आजपासून…
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ४१४ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून तर २२१ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे. जळगाव शहर- ११६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-७९, अमळनेर-२०, चोपडा-७८, पाचोरा-१७, भडगाव-५, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-४, जामनेर-३२, रावेर-०, पारोळा-१६, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८१ रूग्णाचा उपचारादरम्यान…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव : प्रतिनिधी I जिल्ह्यात अवैधरित्या वाळूची तस्करी होत असून ती रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाकरिता 225 कोटी रूपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आले असल्याचेही ना. सत्तार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरात नियोजन मंडळाच्या बैठकी घेऊन विकास आराखड्याला मंजुरी देण्याच्या दृष्टीने सूचित केले होते त्यानुसार आज मी ऑनलाईन या बैठकीस उपस्थिती दिली असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलतांना त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करीच्या वाढत्या तक्रारींबाबत शासनाने दखल घेतली असून मी…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा वार्षीक योजना सर्वसाधारण २२-२3 करीता ३५७ कोटी ४९ लक्ष रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपूराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त ६७ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ४२५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात आज ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे कौतुक केले.…
जळगाव, प्रतिनिधी । मा. भारत निवडणूक आयोग व मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून नियोजित निवडणूक प्रक्रिया वगळून इतर सर्व प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यास मनाई राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, राज्यात कोविड -19 विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव / संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासन आदेश 8 व 9 जानेवारी, 2022 अन्वये सुधारीत निर्बध लागू करण्यात आलेले आहे. शासन आदेशान्वये लागू केलेल्या सुधारीत निर्बंधामध्ये खासगी शिक्षण संस्था/ खासगी सोसायटी यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्याकामी परवानगी मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र,…
ठाणे : वृत्तसंस्था I वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजला ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या महाराजाची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, आज न्यायालय या कालीचारणबाबाबाबत काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली होती. तसेच विविध ठिकाणी या महाराज विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. रायपूर येथे कालीचारण महाराज याला रायपूर येथे अटक करण्यात आली होती.त्यानंतर ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी काल कालीचरणबाबाला ताब्यात घेतले. या कालीचरणबाबाला रायपूर येथून नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज या कालीचरणबाबाला ठाणे न्यायालयात…
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था I भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजेच लोकमान्यता असणारे नेते म्हणून पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच ॲप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. 71 टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिले स्थान मिळवलेय. अमेरिकतील ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील 13 नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह 13 देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी सध्या जळगाव शहरात महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या सर्कलचे नामांतर करण्याची चढाओढ चालली आहे. राजकीय पदाधिकारी,नेते मंडळी ,स्थानिक नगरसेवक त्यासाठी चक्क रस्त्यावर उतरले आहेत आणि दुसरीकडे महापालिकेने शहरातील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करून मालमत्ताधारकांना कित्येक पटींनी घरपट्टी वाढीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.त्यास सर्वच मालमत्ताधारकांचा प्रचंड विरोध आहे मात्र याप्रश्नी कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी आवाज उठविलेला नाही.एकटे ललित कोल्हे सोडले तर नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कोणत्याच सत्ताधारी व विरोधी नगरसेवकाने तोंड उघडलेले नाही त्यामुळे स्थनिक लोकप्रतिनिधी बद्दल जळगावकर नागरिक तीव्र संताप व्यक्त करू लागले आहेत. सध्या जळगाव शहरातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या चौपदरी महामार्गावरील चौकातील सर्कलचे नामकरण करण्याची…