जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाकाळासह संकटसमयी तसेच नेहमीच जळगावकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे एसटी महामंडळाच्या 200 कर्मचाऱ्यांना स्नेहाची शिदोरी याउपक्रमांर्तगत सुमारे महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले. कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर नितीन लढ्ढा, बांधकाम व्यावसायीक अनिष शहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय पाटील, जैन स्पोर्टस् अॅकडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे मीडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त करताना जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या कोरोना काळासह विविध समाजपयोगी कार्याची माहिती दिली. जैन उद्योग समूहाव्दारे गरजुंची भोजनाची व्यवस्था असो की, शहरातील कोणतेही समाजपयोगी कार्य असो जैन…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथे लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने मोफत रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ रोजी आज सुप्रीम कॉलनी येथे लोकसंघर्ष मोर्चा आयोजित मोफत रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, राहुल पाटील, मोरया बहुद्देशीय संस्था अध्यक्ष भरत कर्डिले, लोकसंघर्ष मोर्चा जिल्हाध्यक्ष युवक व समस्त युवक आदी उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त युवासेना जळगाव महानगरतर्फे विनामूल्य युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार व सोमवार दि. २३ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यान युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खान्देश मिल कॉम्प्लेक्स, नेहरू चौक, जळगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. लसीचे दोन डोज घेतलेल्या नागरिकांना सदर युनिव्हर्सल पास बनवून घेता येणार आहे. सार्वजनिक प्रवासासाठी तसेच मॉल्स, सिनेमा गृह इत्यादी ठिकाणी प्रवेशासाठी सदर पास सक्तीने लागणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी युवासेने मार्फत युनिव्हर्सल पास बनवून घ्यावी, असे आवाहन युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, जिल्हा…
जळगाव, प्रतिनिधी । बांभोरी प्र.चा.गावात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत होती, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये दारूचे व्यसनाचे प्रमाण कुटुंबातील कमावत्या व्यति व युवकांमध्ये वाढले होते. त्याचे परिणाम अनेक कुटूंब त्यांचे संसार उध्वस्त होत झाले आहे. दिवसभर कष्ट करून महिला जेव्हा घरी यायच्या त्यांना भांडण-तंटे, हिंसाचार, ला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे कुटुंबातील आर्थिक, सामाजिक, मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत होते. म्हणून गावठी दारू बंद करण्याच्या उद्देशाने आज बांभोरी प्र.चा.चे सरपंच सचिन बिऱ्हाडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश बुवा, ग्रामसेवक दीपक पाठक, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी, हिरामण नन्नवरे, जगदीश नन्नवरे, अमोल नन्नवरे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण नन्नवरे, संतोष नन्नवरे, अनिल नन्नवरे,…
जळगाव, प्रतिनिधी । राज्य मंत्रीमंडळाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील शहरी अर्थात नगरपालिका आणि महापालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्ह्याधिकार्यांनी परवानगी दिली असून याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, सोमवार दिनांक २४ जानेवारी पासून फक्त ग्रामीण भागातील वर्ग सुरू होणार असून नगरपालिका, नगरपरिषद, आणि महापालिका क्षेत्रातील वर्ग मात्र सुरू करण्यात येणार नाहीत. या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात वर्ग सुरू करतांना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा शाळेची घंटा वाजणार असून जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शाळा सुरू करतांना पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले…
जळगाव, प्रतिनिधी । अॅपेक्स रुग्णालयात एका महिलेचा प्रसृतीनंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने पहाटे दोन वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीसह कुटुंबीयांनी केला आहे. तर, डॉक्टरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पूजा जयप्रकाश विश्वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे. गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्वकर्मा हे वास्तव्यास आहेत. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले. याठिकाणी नाॅॅर्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली असता डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांना तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले. यानंतर पूजाला अॅपेक्स हॉस्पिटलच्या…
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमन सौ.मंदाकिनी एकनाथराव खडसे दिनांक १३ जुलै २०२१ पासून दिनांक १७ जानेवारी २०२२ पर्यंत दीर्घ मुदतीच्या रजेवर होत्या. त्यांनी दि. १८ जानेवारी रोजी संघाच्या चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला असून, कामकाज पाहण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर अन्य जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आगवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, आग लागलेल्या ठिकाणी आणखी…
जळगाव, प्रतिनिधी । पारोळा ते मुकटी धुळे रस्त्यावर जळगाव आगाराच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. दुपारी 12:40 च्या दरम्यान बस क्रमांक एम एच 20 BL 4097 ही जळगाव ते धुळे या मार्गावर विच खेडा या गावाजवळ धावत असताना मोटर सायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे (चालक क्रमांक 2880) यांना दुखापत झालेली आहे. त्याचप्रमाणे काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस क्रमांक एम एच 20 3381 या धुळे येथून जळगाव जाणाऱ्या बसवर दुपारी 12:45 च्या सुमारास याच मोटर सायकल स्वार व्यक्तींनी दगडफेक…