फैजपूर: प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख ‘ स्व. बाळासाहेब ठाकरे’ यांच्या जयंती निमित्त सर्व शिवसैनिक-युवासैनिकांच्या व जेष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या उपस्थितीत किशोर निंबाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख अमोलभाऊ निंबाळे यांच्या सहकार्याने परिसरातील सर्व लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पिंटूभाऊ राणे, शिवसेना नगरसेवक तथा शहरप्रमुख अमोलभाऊ निंबाळे, शिवसेना उप ता. प्रमुख राजुभाऊ काठोके, संजय रल, आप्पा चौधरी, युवा सेना शहरप्रमुख गजुभाऊ रोडे,युवासेना शहरप्रसिद्धी प्रमुखभूषणभाऊ जाधव, युवासेना सचिव भास्कर सोनवणे, गोविंदा मिस्त्री, गोपाळ मिस्त्री, हरीचंद्र मिस्त्री, पत्रकार राजेंद्र तायडे, प्रहार शहरप्रमुख विजय मिस्त्री, पिंटू मंडवाले, बंटीभाऊ रल, प्रसाद चित्ते, गोलु चौधरी, प्रतीक वारके, अश्विन गुजराथी, गिरीश चौधरी, मिथिलेश चौधरी, भावेश चौधरी, कल्पेश निंबाळे, केतन चित्ते, ललित निंबाळे, अक्षय चौधरी, योगेश सोनवणे, मोहित माखिजा, स्वयंम चौधरी, गोविंदा कोळी, तुषार रावते, मयूर मिस्त्री,आदी उपस्थित होते.