जळगाव, प्रतिनिधी । आज आपल्याला पाण्याचे महत्व मी सांगणे गरजेचे नाही. देशात आणि जगात पाण्यामुळे होत असलेले वाद मी सांगणार नाही परंतु सुजलाम, सुफलाम असलेल्या माझ्या खान्देश, शेतकरी, तरुण, रोजगार, उद्योग आणि जीडीपीला पाण्याच्या दुर्भिक्षाचा कसा फटका बसतो आहे हे आपण पाहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने हाती घेतलेल्या ‘कॅच द रेन’ उपक्रमात आपले योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः जलसाक्षर, पर्यावरण साक्षर होऊन इतरांना देखील साक्षर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील यांनी केले. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘कॅच द रेन’ उपक्रमाचे महत्व युवकांना पटवून देण्यासाठी रविवारी ऑनलाईन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव कार्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखाकार अजिंक्य गवळी, जेष्ठ नाट्यकर्मी विनोद ढगे, युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, माजी युवा स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, चेतन वाणी, आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी आदींसह इतर उपस्थित होते.
जळगाव : प्रतिनिधी येथील सुप्रिम कॉलनी (वॉर्ड क्रमांक, 19) मध्ये परिसरातील महिलांची बैठक मंगला पाटील जिल्हा महानगर अध्यक्षा, यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली.यावेळी महानगर सरचिटणीस रुपाली पाटील, ॲड. सचिन पाटील, सीमा गोसावी प्रभाग प्रमुख,एड सुरेश पाटील, ॲड.विजय पाटील यांचे प्रमुख उपस्तीत कार्यक्रम झाला. यावेळी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे ध्येय धोरणे बाबत ,आदरणीय शरद चंद्र पवार, सुप्रिया ताई, रुपाली ताई चाकणकर यांनी महिला बाबत केलेले कार्य बद्दल माहिती देण्यात आले.तसेच परिसरातील नागरिकांची विविध दैनंदिन समस्यां जाणून घेण्यात आली. व भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तुमच्या सोबत असून अर्ध्या रात्री ही काही समस्यां आल्यावर ही मंगला ताई…
भुसावळ : प्रतिनिधी येथील सहकारी औद्योगिक वसाहत मर्यादित भुसावळच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत सन 2021-2022 ते 2025-2026 या कार्यकाळाकरिता बिनविरोध सभापतीपदी अजय पाटील तर उपसभापतीपदी जगदीश नारखेडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज चौधरी व एस.डी.उचित यांनी काम पाहिले. या सभेस संस्थेचे संचालक प्रभाकर पाटील, विष्णु चौधरी, जयश्री पाटील, महम्मद नासीर मेमन, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रेमचंद पाटील, शांताबाई झोपे, अतुल महाजन, मिलिंद अग्रवाल व व्यवस्थापक खुशाल पाटील यांची उपस्थिती होती.
जळगाव : प्रतिनिधी सभासद नोंदणी अभियान अधिक सुलभ व जलद गतीने होण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले होते. माननीय जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभले तसेच या कार्यक्रमाचे ट्रेनिंग जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व शहरातील सर्व चीफ एनरोलर दिनांक 22/01/2022 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस भवन येथे प्रशिक्षण शिबिराचे ठिकाणी हजर होते. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, जमील शेख , ज्ञानेश्वर कोडी, रितेश पाटील सुलोचनाताई वाघ जिल्ह्यातून आलेले तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व कार्यकर्ते हजर होते
जळगाव ः प्रतिनिधी येथील बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई काबरा यांनी जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी केले. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष सुलोचना वाघ, युवक जिल्हा अध्यक्ष हितेश पाटील, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, शरद त्र्यंबक पाटील, अध्यक्ष जामनेर तालुका काँग्रेस कमिटी, प्रविण पाटील जिल्हा समन्वयक, मूलचंद नाईक प्रदेश सदस्य, रवि पांढरे , अमित पाटील आदी उपस्थित होते. सुधा काबरा यांनी आजपर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबविले आहेत. शहरातील खड्डेही स्व खर्चाने बूजविले आहे. ज्येष्ठांना घरपोच भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. शाळकरी मुलींच्या समस्या शाळेत जावून सोडविण्यावर त्यांनी बॉक्स ऑफ हेल्पच्या…
जळगाव : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 12 व लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 6 जागा व यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत 1 जागा जिंकत दमदार कामगिरी करणाऱ्या बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जल्लोष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जळगावात साजरा केला. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच शेतकरी,कष्टकरी,कामगार, महिला व अपंग आदी शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत सुध्दा 17 पैकी 6 जागा जिंकून मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.…
भुसावळ : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन महान नेत्यांची जयंती असून त्यांच्या जीवनातून आपल्याला ज्वाजल्य देशभक्ती शिकायला मिळाली आहे. दोन्ही नेते जहाल मतवादी होते. त्यांनी आयुष्यात कधीही शब्द फिरविला नाही. एकनिष्ठ, एकवचनी आणि एकाच विचाराला प्रमाण मानणाऱ्या या नेत्यांच्या विचारांची अंमल बजावणी हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी याप्रसंगी केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील ग्रामपंचायतीत अभिवादन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून कुर्हे येथील ग्रामपंचायतीत छोटेखानी कार्यक्रमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…
धरणगाव : प्रतिनिधी येथील धरणगाव – जळगाव रोडवर असलेल्या महाविर कॉटन नावाच्या कापसाच्या जिनिंग कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून 25 क्विंटल कापसाची चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की धरणगाव – जळगाव रोडवर महावीर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी 23 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून सुमारे 2 लाख 37 हजार रूपये किंमतीचा 25 क्विंटल कापूस चोरून नेला. सदर प्रकार आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कंपनीचे…