Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ह्या कोरोना सारखी आपत्ती असल्याने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जळगावची साडेसहा वर्षाची लेक शिवांगी काळे हिला प्रदान करण्यात आला आहे. आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्‍या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकलीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. ५ जानेवारी २०२१ रोजी एक घटना घडली. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या…

Read More

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र काही पक्षाने जाहीर केल्या नाहीत. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली. गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नीसह लष्करातील ११ अधिकऱ्यांचे निधन झाले. आता रावत यांच्या एका कन्येला भाजप उत्तराखंडच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव भाजपने त्यांना पाठविला. बिपीन रावत यांची सेवानिवृत्तीनंतर उत्तराखंड येथे राहण्याची इच्छा नव्हती. त्यांनी डेहरादून येथे घरही घेतली होते.पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. यापार्श्वभूमीवर भाजपने…

Read More

मुंबई: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. करोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी येथील कुलमखेल वार्डातील रहिवासी सुमित्राबाई हिंगे  (वय -८८ ) यांचे २३ जानेवारी  रोजी रात्री ८वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.  त्यांचे पश्चात चार मुले, एक मुलगी , सूना, नातवंडे, असा परिवार आहे. त्या स्व.कृष्णराव शामराव हिंगे यांच्या पत्नी होत.

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) : नगरसेवक मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील सुमारे ८५ लाख रूपयांच्या  विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या विविध भागांमध्ये वेगाने विकासकामे सुरू झाली असून येत्या काळात नागरिकांना सर्व सुविधा मिळणार असल्याचे नमूद करत नगरसेवक मनोज चौधरी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस…

Read More

फैजपूर: प्रतिनिधी येथील  धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी कॉम चा विद्यार्थी अजय दौलत चौधरी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित दिल्ली येथे राजपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्र डायरेक्टरेट च्या वतीने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देशातील युवा पिढीला एकता आणि शिस्त या माध्यमातून भारतीय सशस्त्र सेनेच्या पूर्वतयारी चे प्रशिक्षण दिले जाते.  सद्यस्थितीत राष्ट्रीय छात्र सेना जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशन असून आर डी सी कॅम्प दिल्ली साठी निवड होणे सर्वच कैडेट्स चे स्वप्न असते. यात रणगाव तालुका रावेर येथील श्री दौलत अभिमन चौधरी व प्रमिला दौलत चौधरी या अत्यंत…

Read More

कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील  वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी वैभव भोंबे याने कला सांस्कृतिक समिती एस. एन. डि. टी. महाविद्यालय, जळगाव  व जिल्हा क्रीडा विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. दि. १२ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान राष्ट्रीय युवा दिन साप्ताह निमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व एस. एन. डि. टी. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील दि. १४ जानेवारी २०२२ रोजी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही बळकटी मध्ये माझी भूमिका,इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नस उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी    येथील देशगौरव नेताजी सुभाष चंद्रबोस यांची जयंती विविध संघटनेच्यावतीने साजरी करण्यात आली येथील तहसील चौकातील नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत पुष्प वाहून नेता जी अमर रहे, भारत माता की जय ,वंदे मातरम, चे नारे देत नेताजी यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.  त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे लोकनियुक्त नगराध्यक्ष हरीश रावळ, तहसीलदार सुरडकर व न.प.मुख्यअधिकारी रमेश ढगे, आरोग्य अधीक्षक योगेश घुगे, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल, आझाद हिंद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्रीकृष्ण भगत, प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप, मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील व शिक्षक कर्मचारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार…

Read More

फैजपूर: प्रतिनिधी येथील मोठ्या मारुती मंदिरा मागील रहिवासी  प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी प्रभाकर पुरुषोत्तमशेठ माहूरकर – भटूशेट माहूरकर (वय -७२) यांचे दिनांक २३ जानेवारी २२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले. ते रविंद्र माहूरकर यांचे वडील होत. त्यांचे पश्चात एक भाऊ, एक बहीण, दोन पुतणे, तीन सूना, नातवंडे, तीन मुली, जावई असा परिवार आहे. ते रविंद्र माहूरकर यांचे वडील होत.

Read More

 सावदा, प्रतिनिधी युसूफ शाह  जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त पालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांचाशिवसेने तर्फे  सत्कार करण्यात आला.       येथील विश्राम गृह येथील प्रांगणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त  प्रतिमा पूजन शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते यांचे हस्ते तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी,शामकांत पाटील ,मिलींद पाटील ,शरद भारंबे ,प्रमोद भंगाळे, अतुल नेहते यांचे उपस्थिती रविवार संध्याकाळी साडे सहा वाजता  करण्यात आले.    यावेळी शहरात पाणीपुरवठा करणारी मांगलवाडी येथील तापी पात्रातून आलेली पाईप लाईन रेल्वे च्या लहान पुला खाली फुटली तिची दुरुस्ती कठीण जागा असून लवकरात लवकर…

Read More