पाचोरा शहरातील जनता वसाहत मधील रहिवासी दामू उखा मोरे वय ९७ यांचे आज मंगळवार दि २५ रोजी सकाळी ६.१५ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून ते धम्म उपासक तथा सेवानिवृत शिक्षक विठ्ठल मोरे सर व रेल्वे कर्मचारी विजय मोरे यांचे वडील तर सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे व गणेश मोरे यांचे आजोबा होत. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार रोजी संध्याकाळी ४.३० वाजता राहते घर जनता वसाहत येथून निघणार आहे.
Author: saimat team
चाळीसगाव( प्रतिनिधी) मुंदखेड येथील रहिवासी श्री रामचंद्र ताना पाटील यांच्यासोबत झाला ग्रामपंचायत कराराबाबत सावळा गोंधळ मागील काही काळापासून यांच्यावर थकबाकी दाखवण्यात आली होती या अनुषंगाने रामचंद्र पाटील यांना दिनांक २२.९.२०२१ या रोजी लोक न्यायालयाची नोटीस देखील पाठवण्यात आली त्या नोटीस मध्ये रु ८२३४/- इतकी थकबाकी आहे असे दाखवण्यात आले , तेव्हा श्री पाटील यांना असे समजले की हा मोठा सावळागोंधळ होत आहे आणि मनमानी कारभार चालू आहे त्यानंतर त्यांनी दिनांक ११.१० २०२१ रोजी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक मगर मॅडम याना अर्ज दिला की सदर व माझे घरपट्टी कुठल्या हीशोबाने आकारण्यात आली आहे त्याची मला पूर्णतः माहिती देण्यात यावी परंतु त्यानंतर त्या…
यावल (सुरेश पाटील) : नेहरू युवा केंद्र जळगाव व यावल तालुक्यातील शिरसाड येथील आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे युवकांसाठीची कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेचे उद्घाटन यावल तालुका तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी साहित्यिक अ.फ.भालेराव सर,माळी कोचिंग क्लासेसचे कैलास माळी सर,नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे,मुस्कान फेगडे हे उपस्थित होते.यावेळी तहसीलदार महेश पवार यांनी नेहरू युवा केंद्राच्या कामाची स्तुती केली आणि उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत युवकांचे आरोग्य व सकारात्मक,जीवनशैली, युवकांच्या मनातील देशाप्रती असणारा अभिमान,मला जगायचंय प्रत्येक सेकंड,अमली पदार्थांच्या सेवनापासून युवकांचा बचाव,युवकांचे कर्तव्य आणि जीवन जगण्याची कला अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ताईनगर येथील साहित्यिक अ.फ.भालेराव…
धुळे -प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सकल्पनेतून संपुर्ण भारतात गोर-गरीब, शेतमजूर, ज्यांना घर नाही अशा सर्वांना घर मिळावे ह्याच उद्देशाने संपुर्ण भारतात पंधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येतात. शासनाच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील संपुर्ण तालुकाभर त्या-त्या ग्रामपंचायतींनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील ज्यांना घर नाही किंवा जांचे घर पडके आहे अशा सर्व लाभार्थ्यांचा सर्वे करुन ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांचा डाटा संबंधीत विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतू सदर पाठविलेल्या यादीला सदर विभागाने कात्री लावल्यामुळे तालुक्यातील अनेक वंचीत राहणार असल्याची माहिती जि.प. सदस्य राम भदाणे यांनी आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळच्या विषयांत दिली व त्याबाबत ज्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे त्या सर्वच…
भडगाव (वार्ताहर) – येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753J वरील भडगाव-पाचोरा रस्त्यादरम्यान आय.टी.आय.भडगाव,जवळ असलेल्या टर्नवर ठेकेदाराने अर्धवट केलेल्या कामामुळे रोजच अपघात होत आहे,शाळा,महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी,नोकरदार वर्ग रोजच ह्याच रस्त्याने आपला जीव मुठीत घालून प्रवास करतात,तरीही अनेकदा ह्याठिकाणी अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण वाढले आहे,ह्या विरोधात पाचोरा जागृत जनमंच तर्फे उपोषण करण्यात येत असून त्याबद्दलचे निवेदन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,खासदार उन्मेष पाटील,आमदार किशोर पाटील,जिल्हाधिकारी,जळगाव इ.ना देण्यात आले असून लवकरात लवकर कामास सुरुवात करुन होत असलेले अपघात थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोवर कामास सुरुवात होत नाही,तोवर उपोषण करणार असल्याचे निवेदन पाचोरा जागृती जनमंचचे निळकंठ पाटील,गुलाब पाटील,प्रवीण पाटील आदि सदस्यांनी प्रशासनास…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३४४ कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे तर दुसरीकडे १५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर ६९ , जळगाव ग्रामीण १५ , भुसावळ५५ ,अमळनेर ३ ,चोपडा ५२ , पाचोरा १५ , भडगाव २ , धरणगाव ७ , यावल १३ , एरंडोल ११ , जामनेर १०, रावेर २०, पारोळा १३ , चाळीसगाव २३ , मुक्ताईनगर १२ , बोदवड १७ , इतर जिल्ह्यातील ७ असे एकूण ३४४ कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४८ हजार २२९ पर्यंत…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 25 जानेवारीपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेला प्राधान्य देऊन कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन शाळा सुरु करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साप्ताहिक कोविड आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस उपायुक्त उज्वला बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप कुलकर्णी, मनापा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात…
जळगाव : प्रतिनिधी नगर भूमापन कार्यालयात उतारा काढण्यासाठी आलेले परीट समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा बांधकाम व्यवसायिक प्रभाकर खर्चे यांना कार्यालय आवारात जबर मारहाण करणाऱ्या नगर भूमापन कार्यलयाचे शिपाई सचिन लक्ष्मण महाले यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ (सर्व भाषिक) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वी नगर भूमापन कार्यालयात उतारा काढण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिक प्रभाकर खर्चे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने कार्यालयातील शिपाई श्री सचिन लक्ष्मण माळी यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करून दोषी असलेले गर भूमापन कार्यालयातील शिपाई श्री सचिन लक्ष्मण माळी…
मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असताना शिवसेनेने भाजपासोबत (BJP) युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यावेळी काही कारणास्तव दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. यावेळी मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचाही विचार केला होता. दहा वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी भाजपासोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीने सोबत यावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. मात्र, काही कारणास्तव दोन्ही पक्ष एकत्र येऊ…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दोन हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाला सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा. ता.चोपडा, जि.जळगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी…