Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 12 व लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 6 जागा व यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव नगरपंचायत निवडणुकीत 1 जागा जिंकत दमदार कामगिरी करणाऱ्या बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाच्या यशाचा जल्लोष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जळगावात साजरा केला. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच शेतकरी,कष्टकरी,कामगार, महिला व अपंग आदी शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकत दमदार कामगिरी केली आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकुर नगरपंचायत निवडणुकीत सुध्दा 17 पैकी 6 जागा जिंकून मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन महान नेत्यांची जयंती असून त्यांच्या जीवनातून आपल्याला ज्वाजल्य देशभक्ती शिकायला मिळाली आहे. दोन्ही नेते जहाल मतवादी होते. त्यांनी आयुष्यात कधीही शब्द फिरविला नाही. एकनिष्ठ, एकवचनी आणि एकाच विचाराला प्रमाण मानणाऱ्या या नेत्यांच्या विचारांची अंमल बजावणी हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी याप्रसंगी  केले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील ग्रामपंचायतीत अभिवादन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून कुर्हे येथील ग्रामपंचायतीत छोटेखानी कार्यक्रमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी येथील धरणगाव – जळगाव रोडवर असलेल्या महाविर कॉटन नावाच्या कापसाच्या जिनिंग कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून 25 क्विंटल कापसाची चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की धरणगाव – जळगाव रोडवर महावीर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी 23 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून सुमारे 2 लाख 37 हजार रूपये किंमतीचा 25 क्विंटल कापूस चोरून नेला. सदर प्रकार आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कंपनीचे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ह्या कोरोना सारखी आपत्ती असल्याने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जळगावची साडेसहा वर्षाची लेक शिवांगी काळे हिला प्रदान करण्यात आला आहे. आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविणार्‍या जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकलीला आज प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. ५ जानेवारी २०२१ रोजी एक घटना घडली. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला. यामुळे त्यांच्या तोंडून किंचाळी बाहेर पडले. बाथरूमच्या बाहेर तेव्हा पाच वर्षाची असणारी शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या…

Read More

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने युद्धपातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र काही पक्षाने जाहीर केल्या नाहीत. उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली. गेल्या महिन्यात तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नीसह लष्करातील ११ अधिकऱ्यांचे निधन झाले. आता रावत यांच्या एका कन्येला भाजप उत्तराखंडच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव भाजपने त्यांना पाठविला. बिपीन रावत यांची सेवानिवृत्तीनंतर उत्तराखंड येथे राहण्याची इच्छा नव्हती. त्यांनी डेहरादून येथे घरही घेतली होते.पण त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. यापार्श्वभूमीवर भाजपने…

Read More

मुंबई: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. मला करोनाची लागण झाली असली तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. करोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी…

Read More

मलकापूर : प्रतिनिधी येथील कुलमखेल वार्डातील रहिवासी सुमित्राबाई हिंगे  (वय -८८ ) यांचे २३ जानेवारी  रोजी रात्री ८वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.  त्यांचे पश्चात चार मुले, एक मुलगी , सूना, नातवंडे, असा परिवार आहे. त्या स्व.कृष्णराव शामराव हिंगे यांच्या पत्नी होत.

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) : नगरसेवक मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील सुमारे ८५ लाख रूपयांच्या  विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या विविध भागांमध्ये वेगाने विकासकामे सुरू झाली असून येत्या काळात नागरिकांना सर्व सुविधा मिळणार असल्याचे नमूद करत नगरसेवक मनोज चौधरी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी बाळासाहेब ठाकरे आणि सुभाषचंद्र बोस…

Read More

फैजपूर: प्रतिनिधी येथील  धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे कैडेट व वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्ष बी कॉम चा विद्यार्थी अजय दौलत चौधरी यांची 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या औचित्याने आयोजित दिल्ली येथे राजपथावर पथसंचलनासाठी महाराष्ट्र डायरेक्टरेट च्या वतीने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देशातील युवा पिढीला एकता आणि शिस्त या माध्यमातून भारतीय सशस्त्र सेनेच्या पूर्वतयारी चे प्रशिक्षण दिले जाते.  सद्यस्थितीत राष्ट्रीय छात्र सेना जगातील सर्वात मोठी युनिफॉर्म यूथ ऑर्गनायझेशन असून आर डी सी कॅम्प दिल्ली साठी निवड होणे सर्वच कैडेट्स चे स्वप्न असते. यात रणगाव तालुका रावेर येथील श्री दौलत अभिमन चौधरी व प्रमिला दौलत चौधरी या अत्यंत…

Read More

कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील  वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी वैभव भोंबे याने कला सांस्कृतिक समिती एस. एन. डि. टी. महाविद्यालय, जळगाव  व जिल्हा क्रीडा विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. दि. १२ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान राष्ट्रीय युवा दिन साप्ताह निमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व एस. एन. डि. टी. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील दि. १४ जानेवारी २०२२ रोजी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही बळकटी मध्ये माझी भूमिका,इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नस उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य…

Read More