Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»धरणगाव येथे जिनिंग कंपनीत 25 क्विंटल कापसाची चोरी
    क्राईम

    धरणगाव येथे जिनिंग कंपनीत 25 क्विंटल कापसाची चोरी

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    येथील धरणगाव – जळगाव रोडवर असलेल्या महाविर कॉटन नावाच्या कापसाच्या जिनिंग कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून 25 क्विंटल कापसाची चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की धरणगाव – जळगाव रोडवर महावीर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी 23 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून सुमारे 2 लाख 37 हजार रूपये किंमतीचा 25 क्विंटल कापूस चोरून नेला. सदर प्रकार आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास कंपनीचे मालक सुभाष काशीनाथ पाटील यांचे चिरंजीव देवा पाटील हे कंपनीत गेले असता त्यांच्या लक्षात आले. दरम्यान चोरट्यांनी संरक्षण भिंत फोडून वाहनाच्या मदतीने कापूस चोरून नेला आहे. याबाबत देवा पाटील यांनी धरणगाव पोलिस स्थानकात सदर माहिती दिली. माहितीवरून धरणगाव पोलिस उपनिरीक्षक  अमोल गुंजाळ यांच्यासह संदीप पाटील, जितेंद्र भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. या संदर्भात देवा पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पंचनामा होऊन धरणगाव पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करीत असल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Kakinada Express : सिग्नल बिघाडाचा गैरफायदा घेत काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोडा

    April 16, 2026

    मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युपीची अट्टल ATM चोर टोळी जेरबंद

    April 15, 2026

    धुळे हादरले! गर्भपाताच्या गोळ्यांचे अतिसेवन ठरले जीवघेणे; १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.