Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । येथे यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी राज्य महिला आयोगाचा इतिहास आणि त्यांनी गेल्या ३ महिन्यात राज्य महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यावर केलेली कामे सर्वांसमोर मांडली. यावेळी महिला आयोगाच्या १५५२०९ या टोल फ्री क्रमांकाचे तसेच कॅलेंडर आणि वार्षिक डायरीचे अनावरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सर्वच प्रमुख पाहुण्यांनी गेल्या ३ महिन्यात विविध माध्यमातून महिला आयोग करत असलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलींच्या लग्नाचे वय २१ असावे का १८ यावर साधक बाधक चर्चा व्हायला हवी असे मत…

Read More

बोदवड, प्रतिनिधी । शेतकरी दूध उत्पादक सहा.सोसायटी मर्या. बोदवडच्या चेअरमनपदी शांताराम कोळी व व्हाईस चेअरमनपदी धनराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शेतकरी दूध उत्पादक सह. सोसा. मर्या. बोदवड संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक संस्थेच्या कार्यालयात बिनविरोध पार पडली त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ई ए हावळे साहेब यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. तसेच आज दि. २५ चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे निवड ही एकनाथ हावळे, लेखापरीक्षक सहकारी संस्था उडते पथक (पदम) जळगाव यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात एकमताने निवळ करण्यात आली. त्यावेळी नवनिर्वाचित संचालक देवानंद भोई, भास्कर गुरचळ, विनोद काळे, रतन सूर्यवंशी, चिंधाबाई माळी, मंजुराबाई माळी, निलेश ठाकरे, युवराज ठोंबरे, विकास भोई,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यात सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातील खोटे नगर येथुन दि. २५ रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या शुभहस्ते फित कापुन सदस्यता नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रवींद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, प्रदेश चिटणिस एजाज मलिक, महिला आघाडीच्या महानराध्यक्षा मंगला पाटील, विनोद देशमुख, योगेश देसले, वाल्मिक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, दुर्गेश पाटील, मजहर पठाण, अकील…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील लोककलावंतांसाठी तमाशा सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. राज्यात तमाशा फड सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांच्याकडून मिळाली होती. यानंतर आता सरकारने राज्यात तमाशा सुरू करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोककलावंतांनी मोठा दिलासा मिळणार आहे. अजित पवार यांनी पहिल्या भेटीत लोककलावंतांना राष्ट्रवादी हेल्पलाइन कडून १ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. प्रत्येकी कलावंताला 3 हजार रुपये देण्याचे शरद पवार यांनी कबूल केले त्यानंतर अजित पवार यांनी 1 फेब्रुवारीपासून तमाशा कार्यक्रमाला परवानगी देत असून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील २२ वर्षीय विवाहितेचा तीन लाखासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध पाच एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी येथील तुळजामाता परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेला माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणारी पल्लवी किरण शिंदे (वय-२२) हिचा विवाह १८ एप्रिल २०१९ रोजी किरण हरचंद शिंदे रा. कापुसवाडी ता. जामनेर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचा एक महिन्यानंतर पती किरण शिंदे यांनी ‘स्वयंपाक व शेती काम येत नाही असे’…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार- 2022 प्राप्त कु.शिवांगी प्रसाद काळे (रा. कोल्हेनगर, जळगाव) हिच्या घरी आज मंगळवार, दि.25 जानेवारी 2022 रोजी जाऊन तिचा जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत यथोचित सत्कार करून तिच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच उत्तम संस्कार व धैर्यशील पालकत्व निभावणार्‍या शिवांगीच्या आई सौ.गुलबक्षी व वडील श्री.प्रसाद काळे यांचेही त्यांनी मनापासून अभिनंदन केले. कु.शिवांगी काळेचा जन्म 16 एप्रिल 2015 मधील. तिने अवघे सहा वर्षे वय असताना स्वतःमधील धैर्यता दाखविली. त्यात कु.शिवांगीने स्वतः समयसूचकता दाखवत आपली आई व…

Read More

नांदेड, वृत्तसंस्था । भारतीय पोलीस सेवेतील १९९५ बॅचचे झारखंड राज्यात कार्यरत असलेल्या अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) संजय आनंदराव लाठकर, यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान हा देशातील पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना दिला जातो. संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्षे देशातील बिहार, झारखंड, महाराष्ट्र राज्यात व सीआरपीएफ मध्ये सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी आठ विभिन्न पदके देऊन सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, दोन वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखंड यांचे शौर्य पदक, राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील ट्रान्सपोर्ट नागरजवळ महामार्गावर कारने एका दुचाकी चालकाला धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत एका महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. अजिंठा चौकातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलासह दोन जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली गणेश लोखंडे (वय ४१, रा. अशोकनगर, अयोध्यानगर जळगाव) त्यांचा मुलगा जयेश व बहिणीचा मुलगा वैभव असे तीघे (एमएच १९ डीजी ५४९३) ने दुचाकीने सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एकाला आज बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरूणाला शनिपेठ पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी अटक केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत त्याच्याकडे असलेली तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील चौगुले प्लॉट परिसरात संशयित आरोपी पंकज भानुदास चौधरी (वय-२४) हा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक कांबळे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे, राहुल पाटील यांनी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी पंकज चौधरी याला अटक केली. त्याच्या ताब्यात असलेली धारदार तलवार हस्तगत…

Read More