जळगाव, प्रतिनिधी । शहरातील अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. जळगाव शिरसोली अप रेल्वे लाईनवरील धानोरा शिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एस.बी. सनस (उप स्टेशन प्रबंधक, जळगव) यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. मयत तरुणाचे अंदाजे वय ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे समजते. २ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणातील मयत अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. रंगाने सावळा, अंगाने मध्यम असलेल्या या तरुणाची दाढी बारीक वाढलेली असून तो…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी जेष्ठ नागरिक आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे व जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठीकीच्या सुरवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष सुरेश सोनार यांनी केले. तसेच जळगाव महानगराच्या ९ मंडलाची रचना विशद केली. जेष्ठ नागरिक आघाडीच्या माध्यमातून जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिक बंधू-बघिनिना विशेषतः जेष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या यामध्ये सहकार्य, मदत करून समाजाची सेवा करण्याची रचना करण्यात आली. जळगाव महानगरातील जेष्ठ नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक तसेच विविध शासकीय,…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित मानली जात आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता मिळू शकतो. निर्देशांक, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे सन 2001 नुसार, डिसेंबर 2021 साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाल्याने निर्देशांक 361 अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. या सरासरी निर्देशांकावर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो शकतो. सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2022 पासून 3 टक्के अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता एकूण महागाई भत्ता 34 टक्के झाला आहे.
जळगाव, प्रतिनिधी । विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्या, कुणाशीही न बोलणार्या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला.…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अकृषिक स्थावर मालमत्तेच्या व्यवहाराशी संबंधित टीडीएस नियमही अर्थसंकल्पात बदलण्यात आले. नवीन नियमानुसार, आता 50 लाख रुपयांपेक्षा जास्त अकृषिक मालमत्तेच्या व्यवहारावरील विक्री किंमत किंवा मुद्रांक शुल्क मूल्यापेक्षा जे जास्त असेल त्यावर, 1 टक्के टीडीएस भरवा लागणार आहे. म्हणजेच आता घर खरेदी करणाऱ्यांचे खिसे मोकळे होणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून लागू आता नव्या नियमानुसार यासाठी प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. हा बदल यावर्षी 1 एप्रिलपासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल. कर चोरी थांबेल मालमत्ता व्यवहारातील…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभुमिजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागुन श्रीकृष्ण नगरातील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक असे की, शहरातील श्रीकृष्ण नगरात सागर अरूण सरोदे वय 30, हा आपल्या आई वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास आहे. दोन्ही भाऊ शहरातील महात्मा गांधी मार्केट परीसरात भाजीपाला विक्री करून आपल्या कु टुंबाचा उदरनिर्वाह करतात. सागर सरोदे हा आज पहाटेच्या सुमारास घरात काही न सांगता निघुन गेला होता. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेचा जवळ धक्का लागुन तो गंभीर जखमी झाल्ाा…
मुंबई, वृत्तसंस्था । दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. “या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असे गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 4 ते 30 मार्च लेखी परीक्षा होणार असून 14 फेबु्रवारी…
जळगाव, प्रतिनिधी । मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटविणारे अभिनेते रमेश देव यांचे काल ह्दयविकाराने निधन झाल्याचे वृत्त येताच जळगाव शहरातही त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.रमेश देव व त्यांच्या पत्नी,अभिनेत्री सीमा देव व अभिनेता अजिंक्य देव यांचे जळगावशी प्रेम व जिव्हाळाचं नातं निर्माण झाले होते.रमेश देव व सीमादेव यांनी जळगावला चार- पाच वेळा भेटी दिल्या होत्या.तो काळ 1980 ते 1990 चा होता.त्याच काळात शहरातील ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे यांनी रमेश देव यांची सिने जर्नालिस्ट म्हणून तीन-चार वेळा वृत्तपत्रासाठी विशेष मुलाखती घेतल्या होत्या व त्या जनशक्तीच्या चित्रपटविषयक चित्ररुप पुरवणीत प्रसिध्द झाल्या होत्या.त्या मुलाखतींचे रमेश देव व सीमा देव यांनी…
जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली. महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाष चंद्र बोस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे प्राचार्य गणेश पाटील, समन्वयिक स्वाती अहिरराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख भारती अत्तरदे मुलांच्या हस्ते सरस्वती पूजन व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी पाचवी चे विद्यार्थी मोहक जैन, विनायक शिरोळे, रजत शर्मा, आदित्य चौधरी या विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र बोस, सुखदेव, राजगुरू व भगतसिंग यांचे पात्र साकारले व त्यांच्या पात्राचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेचे प्राचार्य गणेश पाटील…
जळगाव, प्रतिनिधी । एका ७२ वर्षीय वृद्धाच्या खिशातून पंधरा हजार रुपये किमतीची मंगलपोत लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते विद्यूत कॉलनी दरम्यान ७२ वर्षीय वयोवृध्दाच्या खिश्यातून १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चार जणांनी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जलील शेख इब्राहिम (वय ७२, रा. पंचशील नगर, तांबापूर जळगाव) हे कामाच्या निमित्ताने बुधवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात आले होते. त्यांचे काम आटोपून ते…