Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार – राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
    मुंबई

    दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार – राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

    saimat teamBy saimat teamFebruary 3, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

    “या परीक्षांचा फॉरमॅट पाहिला तर संक्षिप्त, सविस्तर आणि दिर्घोत्तर प्रश्न अशी रचना आहे. त्यात दोन्ही परीक्षांचा विचार केला तर 31 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असताना ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा पुरवता येणार नाहीत,” असे गोसावी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

    4 ते 30 मार्च लेखी परीक्षा होणार असून 14 फेबु्रवारी ते 4 मार्च तोंडी परीक्षा होतील अशी माहिती देण्यात आली आहे. 70 ते 80 गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून 40 ते 60 गुणांच्या पेपरला 15 मिनिटे अधिक वेळ दिला जाईल. कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर 31 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचे महाविद्यालय केंद्र असणार आहे.

    दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूुस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमावर दिली होती.

    मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने समाजमाध्यमावर जाहीर केले होते. या ‘हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांनी विद्यार्थ्यांना चिथावणी मिळाली आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात यासाठी आंदोलने केली होती. यामध्ये काही ठिकाणी हिंसाचारही झाला. या प्रकरणात हिंदूस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली असून त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    जळगावसह राज्यातील बाजार समित्यांत नवा नियम लागू; कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य

    April 16, 2026

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय आधार; जळगावातील १६१० रुग्णांना १३ कोटींची मदत

    April 16, 2026

    विमानतळावर टॅक्सींग करताना दोन विमानांची टक्कर झाल्याने एक मोठा अपघात टळला.

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.