मुंबई, वृत्तसंस्था । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळकडून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना नशिराबाद जवळील पाटील नर्सरीजवळ घडली. याप्रकरणी शनिवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर भास्कर झाल्टे (वय-२४) रा. पातोंडा ता. नांदूरा जि. बुलढाणा असे मयताचे नाव आहे. किशोर झाल्टे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी काम करून उदरनिर्वाह करत होते.…
मुंबई, वृत्तसंस्था । ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ वर्षी निधन झाले आहे. याप्रकरणी त्यांना न्यूमोनिया झाल्याची लागण झाली होती. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहेत सदर स्पर्धा या 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत. जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ आज जाहीर करण्यात आला तो खालील प्रमाणे; वरुण पाटील (कर्णधार), मानस पाटील, राज राजपूत, तनय प्रसाद, श्लोक महाजन, दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक), यश अग्रवाल, मोहित जगताप, आर्यन पाटील, प्रतीक शिंदे (उपकर्णधार), प्रणव जाधव, केशव ठाकूर, दिविक उपाध्याय, पियुष पवार, आदित्य वाणी, सोहम बडगुजर, अभय वाघमोडे, कृष्णा महाजन, जैनम जैन आणि आर्यन बडगे. जळगाव…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एका परिसरातील वृद्धाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण गिरधर धांडे (वय ७४ वर्ष रा. संचित रणछोड नगर जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना…
लखनौ : वृत्तसंस्था – योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करायला जायच्या आधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक सभाही घेतली. गोरखपूरचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गोरखपूर शहरी जागेवर 3 मार्च रोजी मतदान होणार आहे. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी असेही घोषित केले की, त्यांच्याकडे 12 हजार रुपये…
जळगाव, प्रतिनिधी । जसजशी थंडी वाढत आहे तसतसे नाक-कान-घसा विकाराचे रूग्णही वाढु लागले आहेत. काहींना या तीनही अवयवांशी निगडीत जुन्या व्याधींनी या काळात अधिकच त्रस्त केले आहे. अशा सर्व गरजु रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागांतर्गत आयोजित शिबिराला सुरूवात झाली आहे. निष्णात आणि तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिराच्या पहिल्याच दिवशी रूग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. डॉ. उल्हास पाटील वैैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांसाठी विविध विभागांतर्गत नि:शुल्क उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नाक-कान-घसा या मानवाच्या अतिशय महत्वाच्या अवयवांशी निगडीत जुन्या आणि नव्याने उद्भवणार्या विकारांवर उपचार करण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे. शिबिरासाठी नाक-कान-घसा विभागातील…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला तब्बल 29 वर्षांनी संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आली आहे. देशातील सर्वांत मोठा बॉम्बस्फोटात तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. या संदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले आहे. अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सचे लॅन्डिंग आणि दाऊबसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर 29 वर्षांनी अबू बकर भारतीय यंत्रणांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. भारतात आणण्याची शक्यता अबू…
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाच्या सूचनेप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती. या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले…
धुळे, वृत्तसंस्था । शहरातील एका भागात राहणाऱ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने व पतीच्या भावाने मिळून दांडक्याने जबर मारहाण करून तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. यासंदर्भात धुळे शहर (police) पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. संशयीत आरोपी मयूर शार्दूलधुळे शहरातील मिल परिसरात काल सायंकाळी अनैतिक संबंधाच्या वादातून निखिल पाटील या 21 वर्षीय तरुणाचा मयूर शार्दुल नामक तरुणाने तसेच त्याच्या दोन भावांनी जबर मारहाण करीत निखिल पाटील या तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या अनेक वर्षापासून निखिल पाटील हा मयूर शार्दुल याचा खास मित्र होता. गेले अनेक वर्ष परिसरात दोघांची मैत्री होती. मात्र…