सोयगाव, प्रतिनिधी । सोयगाव-कंकराळा रस्त्यावर अज्ञात वाहनाने उडविलेल्या जखमी माकडावर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्यावर उपचार करून माकडाचे प्राण वाचाविल्याची घटना रविवारी दुपारी घडली.शिवसेनेचे संघटक दिलीप मचे यांनी पुद्गाकार घेवून जखमी माकडावर उपचार केले. सोयगाव-बनोटी रस्त्यावर कंकराळा गावाजवळ अचानक भरधाव आलेली वाहनाने रस्त्यावरील माकडाला उडविल्याने जखमी अवस्थेत विव्हळत असलेली माकडाला शिवसेनेचे संघटक दिलीप मचे यांनी तातडीने उपचार करून त्या माकडाचे प्राण वाचविले आहे.सोयगाव –बनोटी रस्त्यावर कंकराळा गावाजवळ मोकाट माकडांचा रस्त्यावर मोठा उच्छाद झालेला आहे.रविवारी सोयगाव कडून येणाऱ्या वाहनाच्या धडकेत माकड जखमी झाले होते त्याचेवर ग्रामाथांनी उपचार करून त्या माकडाचे प्राण वाचवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.या प्रकारची तालुकाभर चर्चा सुरु होती.
Author: saimat team
सोयगाव, प्रतिनिधी । राजकीय नाट्यमय घडामोडींनी राज्यभर गाजलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची सोमवारी होणारी निवडीची विशेष सभा मंगळवारी ढकलण्यात आलेली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी सोमवारी दिले.दरम्यान निवड प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांना याबाबत ऐनवेळी कल्पना मिळाल्याने अखेरीस निवड प्रक्रियेच्या कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. सोयगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या सोडत सोमवारी होती परंतु गायन साम्राज्ञी लता दीदींच्या निधनामुळे सोमवारी राज्यभर शासकीय सुटी व दुखवटा जाहीर करण्यात आल्याने अखेरीस नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून मंगळवारी पूर्वनियोजित वेळेप्रमाणे हि निवड सभागृहात घेण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.त्यामुळे सोयगाव नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या उत्सुकता पुन्हा एक दिवस लांबणीवर गेली आहे.सोयगाव…
जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांचा निकालानंतर सोमवारी सुवर्णपदक धारकांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अर्चना महेश पंजाबी हिने प्रावीण्य मिळवले आहे. ती राज्यातून पाचवी आली असून औषधशास्त्र विषयात राज्यातून प्रथम आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची अर्चना महेश पंजाबी या विद्यार्थिनीने सर्वोत्तम यश मिळवले आहे. पहिल्या वर्षी देखील तिने महाविद्यालयातून उत्तम गुणांकन प्राप्त केले होते. आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निकालातही तिने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयचे नाव उंचावले आहे. राज्यभरातून ती पाचवी आली असून तिचे सर्वत्र कौतुक होत…
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी चौकशी समिती गठित केली आहे. कोणी नागरिकांना आर्थिक देवाण-घेवाण करून बोगस आरटीपीसीआर अहवाल प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्यांनी पुराव्यासह गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी हजर राहावे असे आवाहन या समितीने केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पैसे घेऊन बनावट आरटीपीसीआर अहवाल दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीमध्ये उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश आहे. समितीची चौकशी सुरू झाली असून समितीच्या कामकाजाला सहकार्य म्हणून समितीने नागरिकांना आवाहन…
जळगाव, प्रतिनिधी । इकरा एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे इकरा वैद्यकीय महाविद्यालय, डी एड कॉलेज, बी.एड कॉलेज व इकरा पब्लिक स्कूलतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. आज दिनांक ७ रोजी इकरा एज्युकेशन कॉम्प्लेक्स येथे इकरा शिक्षण संस्था संचलित इकरा वैद्यकीय महाविद्यालय,डी एड कॉलेज, b.ed कॉलेज व इकरा पब्लिक स्कूलतर्फे भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. लता मंगेशकर हे एक युग संपले आहे, त्यानी आजअमर असे गीत गायले आहे. आवाज ही मेरी पहचान है असे थे नेहमी म्हणत लता मंगेशकर भारताची कोकीळा संबोधले जाते. तसेच राज्य शासनाकडुन दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या शोकसभेत इकरा वैद्यकीय…
अमृतसर, वृत्तसंस्था । आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये चरणजितसिंग चन्नी हे पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असं राहुल गांधी यांनी रविवारी दुपारी जाहीर केल. .यामुळे नवज्योत सिंग सिद्धू या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. परंतु सत्ता आल्यावर त्यांचं महत्त्वाचं स्थान असेल असे संकेतही मिळाले आहेत. चन्नी यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर लगेचच त्यांनी सिद्धू यांच्या पाया पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर लगेचच सिद्धू यांनी चन्नी यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे चन्नी एक हात वर उंचावून विजेत्याप्रमाणे अभिवादन केले.त्यानंतर राहुल गांधी, नवज्योत सिंग सिद्धू आणि चरणजितसिंग चन्नी या तिघांनीही एकमेकांना मिठी मारत अभिवादन केलं आणि आपले हात उंचावून एकीचा संदेश देत पक्षात कटुता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये 15 जून 2020 रोजी चीनसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले बिहारचे नाईक दीपक सिंह यांची 23 वर्षीय पत्नी रेखा देवी यांनीही आपल्या पतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रेखा देवी या मूळच्या मध्य प्रदेशातील रीवा येथील असून त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या लष्करात अधिकारी म्हणून काम करणार आहेत. शहीद दीपक सिंह बिहार रेजिमेंटच्या 16 व्या बटालियनमध्ये होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना हुसकावून लावताना ते शहीद झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दीपक सिंह यांच्या पत्नी रेखा…
अरुणाचल प्रदेश, वृत्तसंस्था । अरुणाचल प्रदेशच्या कामेंग सेक्टरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अतिउंचीवर असलेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान अडकले गेल्याचं वृत्त आहे. हिमस्खलनाची एक मोठी घटना घडली आहे. हिमस्खलनाचा तडाखा बसलेल्या लष्कराच्या गस्ती दलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलं आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं वातावरणात बिघाड झाला आहे. हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याची बातमी आहे. यानंतर सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना विशेषतः सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.…
अमळनेर, प्रतिनिधी । बाटलीमध्ये पेट्रोल भरून दिले नाही म्हणून तीन जणांनी पंपावर काम करणाऱ्या ऑपरेटर ला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून ऑपरेटरला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे रा. झाडी ता. अमळनेर हा कामावर असतांना त्याठिकाणी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित…
श्रीनगर, वृत्तसंस्था । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देणारं भाषण करणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज सकाळी राज्यसभेमध्ये तर दुपारीलोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 फेब्रवारी रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता. या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा…