सोयगाव, प्रतिनिधी । सोयगाव-कंकराळा रस्त्यावर अज्ञात वाहनाने उडविलेल्या जखमी माकडावर परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्यावर उपचार करून माकडाचे प्राण वाचाविल्याची घटना रविवारी दुपारी घडली.शिवसेनेचे संघटक दिलीप मचे यांनी पुद्गाकार घेवून जखमी माकडावर उपचार केले.
सोयगाव-बनोटी रस्त्यावर कंकराळा गावाजवळ अचानक भरधाव आलेली वाहनाने रस्त्यावरील माकडाला उडविल्याने जखमी अवस्थेत विव्हळत असलेली माकडाला शिवसेनेचे संघटक दिलीप मचे यांनी तातडीने उपचार करून त्या माकडाचे प्राण वाचविले आहे.सोयगाव –बनोटी रस्त्यावर कंकराळा गावाजवळ मोकाट माकडांचा रस्त्यावर मोठा उच्छाद झालेला आहे.रविवारी सोयगाव कडून येणाऱ्या वाहनाच्या धडकेत माकड जखमी झाले होते त्याचेवर ग्रामाथांनी उपचार करून त्या माकडाचे प्राण वाचवून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.या प्रकारची तालुकाभर चर्चा सुरु होती.