Author: saimat team

पाचोरा, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून शरद युवा संवाद यात्रा आज दि.8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात शरद युवा संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व युवक, कार्यकर्ते, बूथप्रमुख, बूथ कार्यकर्ते, युवती, महिला तसेच सर्व फ्रंटचे प्रमुख…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही हत्या केली तिनेच फोन करुन पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. परमेश्वर कोकाटे या तरुणाने 4 फेब्रुवारी रोजी रात्री 12 च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. गॅरेजमध्ये एक व्यक्ती जळलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती परमेश्वरने दिली. महिती मिळताच लगेच दहिसर पोलीस स्थानकातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. याबाबतचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर भारतासह मध्य प्रदेश ते छत्तीसगडपर्यंत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. काही भागांत गारपिटीचीही शक्यता आहे. गारपिटीचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती निवळल्यानंतर पुन्हा गारवा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर दोन दिवसांनंतर पश्चिम भारतात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी“ या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नियोजन भवनात झाली.आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी स्वतः तक्रारींची सुनावणी घेतली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी“ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जनसुनावणीवेळी जिल्हाधिकारी अभीजित राऊत, पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, सदस्या उत्कर्षा रुपवते,दीपिका चव्हाण,जि.प.चे सीईओ पंकज आशिया,प्रकल्प अधिकारी विजयसिंग परदेशी…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे. बंदरे, विमानतळे,खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमुख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी 88.5 बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचे ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलेय. याचवेळी अंबानींची एकूण संपत्ती ही 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी आहे.अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कुसुंबा येथील दत्त मंदिर परिसरात गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. कुसुंबा येथील दत्त मंदिर परिसरात गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी लतादीदींच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, त्यांचे कार्य किती मोठं होते मनोगत व्यक्त करण्यात आले तसेच लतादीदी ना जब तक सुरज चांद रहेगा लतादीदी आपका नाम रहेगा अशा जयघोषात व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गंगाधर घुगे , ईश्वर पाटील राजू पाटील, रवींद्र कोळी, सुधाकर पाटील, किरण पाटील, गणेश राजपूत, मुकेश राजपूत, धनसिंग पाटील, अजय पाटील, सागर कासार, दिलीप…

Read More

यावल, प्रतिनिधी । रविवार दि. ६ रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याकरीता आवश्यक असलेले ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान पाचवे सत्रात पोहोचले आहे. तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत जवळ सदर सत्र घेण्यात आले,निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास पाचव्या टप्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.सदर अभियानात गावातील एकूण346लाभार्थ्यांनी लाभ घेतला.या अभियानाचे उदघाट्न जिल्हा परिषद सदस्या सौ.सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे,अतुल भालेराव, अजय भालेराव(सरपंच )पंकज चौधरी(उपसरपंच),भूषण फेगडे, फकिरा तडवी,नबाब तडवी,हाजी शिवरु वजीर,हमीद तडवी,संदिप लोहार,असलम तडवी,संजय पाटील, सतार तडवी,कादिर तडवी गफार तडवी,संजू चौधरी, राजू तडवी,लतेश चौधरी,दर्शन चौधरी,रवींद्र बागुल,सागर चौधरी, शाहरुख…

Read More

जळगांव , प्रतिनिधी । येथील इकरा एज्युकेशन सोसायटी द्वारे संचलित ‘इकरा उर्दू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन ‘ तर्फे D.L.ED. च्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षात लक्षणीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या अध्यक्षतेखाली जवेरिया युसूफ खान यांनी कुराण पठन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्राचार्या सईदा वकील यांनी परीक्षेच्या निकालाची माहिती दिली. शेख नबिला मुख्तार 94.35 प्रथम, शेख इरम अफजल 93.10 द्वितीय, काझी महेवश फातिमा मुजम्मिलोद्दीन 92.95 तृतीय,. तसेच प्रथम वर्षा मध्ये शेख शाइमा मरियम उस्मान 88.50% प्रथम, बुशरा परवीन हारून रशीद 87.60% द्वितीय, उंबरीन शेख सलीम 85.30 % गुण मिळवून…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी“ या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार दि. 08 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे सकाळी 11.00 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी“ हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण…

Read More