सोयगाव, प्रतिनिधी । राजकीय नाट्यमय घडामोडींनी राज्यभर गाजलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची सोमवारी होणारी निवडीची विशेष सभा मंगळवारी ढकलण्यात आलेली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी सोमवारी दिले.दरम्यान निवड प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक कर्मचाऱ्यांना याबाबत ऐनवेळी कल्पना मिळाल्याने अखेरीस निवड प्रक्रियेच्या कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले.
सोयगाव नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या सोडत सोमवारी होती परंतु गायन साम्राज्ञी लता दीदींच्या निधनामुळे सोमवारी राज्यभर शासकीय सुटी व दुखवटा जाहीर करण्यात आल्याने अखेरीस नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून मंगळवारी पूर्वनियोजित वेळेप्रमाणे हि निवड सभागृहात घेण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.त्यामुळे सोयगाव नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या उत्सुकता पुन्हा एक दिवस लांबणीवर गेली आहे.सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या नगरसेविका आशाबी तडवी यांचा एक मेव अर्ज आलेला असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे परंतु उपनगराध्यक्ष पदासाठीची उत्सुकता लागून आहे.
मंगळवारी होणार निवड
सोमवारी राज्यभर दुखवटा जाहीर करण्यात आल्याने सोमवारी होणारी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवारी पीठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव बचत भुवन सहगृहात विशेष सभा घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले.