जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा मेडिसीन डिलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. बैठकीत संघटनेची निवडणूक न करता अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची सहाव्यांदा निवड करण्यात आली. तर सचिवपदी अनिल झंवर व कोषाध्यक्षपदी शामकांत वाणी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत केमिस्ट संघटनेच्या २०२०-२०२३ या पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. संघटनेचे ज्येष्ठ सभासद राजाभाऊ काबरा, मोहसिनभाई करमपूरवाला यांच्या शिष्टाईच्या माध्यमातून आणि संकल्पनेतून यावर्षी निवडणूक न घेता एकमताने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. भंगाळे हे गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून अध्यक्षपदावर विराजमान आहेत. सभेत १४ विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेला जिल्हाभरातील ९०० सभासद उपस्थित…
Author: saimat team
धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांची परिस्थिती खालावली असलेल्यामुळे यंदा दिवाळीच्या पणत्या प्रत्येकाच्या घरी उजळतांना अडचणींचा अंधकार आल्याने खरतर ज्या मुलींचे मातृ-पितृ छत्र हरपले अशा मुलांच्या जीवनातील अंधकार दूर करावा, याची जाणीव ठेवून धानोरा येथील वधू-वराने आपल्या साखरपुड्याच्या मुहूर्ता प्रसंगी गावातील मातृ-पितृ छत्र हरपलेल्या मुलींना शिक्षणासाठी हातभार लागावा या हेतूने तीन मुलींचा वर्षभराचा खर्च उमेश उर्फ हिमांशू व डॉ. मयुरी या नवदाम्पत्याने नवीन जीवनाची सुरुवात एका चांगल्या उपक्रमाने करून समाजातील तरुणांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. वास्तविक विवाह म्हटला म्हणजे खर्चाची परवनी आलीच. मात्र, याला फाटा देत या नवदाम्पत्यांनी मातृ-पितृ हरवलेल्या मुलींच्या जीवनातील अंधःकार दूर करण्यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर बांभोरी जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पोलीस विभागातील विधी अधिकारी जागीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेला एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही जण आज सकाळी पारोळा येथे कामानिमित्त जात असल्याचे समजते. या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दुर्गादासगिरी गोसावी (रा.पाचोरा) आणि शनीपेठ पोलीस स्थानकात कार्यरत संदीप भिकन पाटील (रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे आज सकाळी दुचाकीने जळगावहून पारोळ्याकडे कामामित्त जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर बांभोरीजवळ त्यांना एका अज्ञात…
पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील लोकसत्ताचे प्रतिनिधी प्रवीण ब्राह्मणे यांनी आज मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील ,पाचोरा विधानसभेचे आ. किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रविण ब्राह्मणे हे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गेल्या वेळी २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणूक लढवली होती तसेच पाचोरा पिपल्स बँकेची देखील निवडणूक लढवली होती.सडेतोड,प्रामाणिक, स्पष्ट वक्ते, सामाजिक कार्यकर्ते, अन्यायाला वाचा फोडणारे, बेधडक पत्रकार म्हणून ओळख असणारे प्रविण ब्राह्मणे यांनी लोकमत, सकाळ आदी प्रमुख वृत्तपत्रांसाठी काम केले असून आता ते लोकसत्ता वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत तसेच…
अमळनेर ः प्रतिनिधी महाविकास आघाडीतर्फे मतदारसंघातील ८९ नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा गौरव सोहळा उद्या दि.२१ रोजी दुारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आ.अनिल भाईदास पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवांकित करण्यात येणार आहे. या समारंभात मतदारसंघातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आ.अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत हा विकासाचा महत्वाचा कणा आहे. ग्रामपंचायतीत विजयी झालेल्या नवनियुक्त सदस्यांना गावाचे विकासकामे मिळण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने आ.अनिल भाईदास पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी मतदारसंघातील सर्व सदस्यांनी भेदाभेद न करता या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व आपल्या गौरवाची संधी द्यावी, असे आवाहन आ.अनिल पाटील व…
जळगाव ः प्रतिनिधी मविप्र संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी सन २०१८ पासून पदोन्नतीचे दिलेले प्रस्तावास आपल्या कार्यालयाने मान्यता आजतागायत दिलेली आहे. आम्ही मुख्याध्यापक देखील याचं संचालक मंडळाचे आदेश मानत आलोय… आमच्या संस्थेत कार्यालय देखील एकच आहे, तिथून निलेश भोईटे यांचे संचालक मंडळ कारभार सुरळीत सुरु असून संस्थेने केलेल्या बदल्या व पदोन्नती प्रस्तावास तात्काळ मान्यता प्रदान करण्यात यावे या मागणीसाठी मविप्र संस्थेच्या सर्व २८ मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी यांना काल रोजी निवेदन दिले. मुख्याध्यापकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संस्थेने शाखेवार कर्मचार्यांच्या विनंतीवरून तसेच प्रशासकीय कारणास्तव केलेल्या बदल्या व पदोन्नती यांना मान्यता मिळू नये, कर्मचार्यांना वेठीस धरणे तसेच बदली झालेल्या जवळच्या लोकांना…
जळगाव ः प्रतिनिधी येथील भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि पुणे अंधजन मंडळ यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू असलेल्या ’कांताई नेत्रालयाने’ पाच वर्षांत १५ हजार नेत्रशस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे. अलीकडेच काळात नवजात अर्भकांचे दृष्टीदोष दूर करण्यासाठी आधुनिक पद्धतीने निदान व उपचार सेवेची सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती नेत्रालयाच्या मेडिकल डायरेक्टर व नेत्रविशारद डॉ. भावना अतुल जैन यांनी दिली. कांताई नेत्रालयाचा पाचवा वर्धापनदिन दि.१९ रोजी साजरा झाला. जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी पत्नी कांताबाई यांच्या स्मरणार्थ दि. १९ जानेवारी २०१६ रोजी नेत्रालयाचा प्रारंभ केला होता. डॉ. भावना जैन यांनी नेत्रालयातर्फे गेल्या पाच वर्षांत दिलेल्या नेत्र उपचार व…
भुसावळ : प्रतिनिधी चाळीस वर्षीय न्यायालयीन लढाईच्या विजयानंतरही भूमी अभिलेख विभागाने प्रदीप पाटील यांच्यावर न्यायासाठी आत्मदहनाची वेळ आणली असून ते येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. दरम्यान, याबाबत चौकशीकामी पाटील यांना जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात बोलवण्यात आले असल्याचे वृत्त आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील न्यू एरीया प्लॉटमधील सि.स.नं.३२७७ ही मिळकत प्रदिप पितांबर पाटील यांच्या मालकीची आहे. त्यांच्या शेजारी सिताराम गुलाबचंद अग्रवाल यांची सि.स.नं. ३२८१ ही मिळकत आहे. १९७८ मध्ये सिताराम गुलाबचंद अग्रवाल यांची प्रदीप पाटील यांच्यावर त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचा दावा केला होता. दरम्यान, दावा सुरु ठेवतच अग्रवाल यांनी सदर मिळकत १९९६ मध्ये विकून…
जळगाव : प्रतिनिधी शहरात अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्याने मनपा प्रशासनाकडून महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. महास्वच्छता अभियानाच्या पहिल्याच दिवशी महापौरांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. नागरिकांना कर भरून देखिल मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी महापौरांसह पदाधिकार्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. अभियानाच्या पहिल्या दिवशी शहरातून तब्बल ३०८ टन कचरा संकलन करण्यात आला. शहरात साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. अस्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढल्याने महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले आहे. सोमवार दि. १८ रोजी शिवाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणीपुरवठा…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील श्रीनगर ते विद्यानगर या दोन्ही भागांना जोडणार्या बलबलकाशी नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांनी दिली . यामुळे प्रभाग ७ व ८ मधील सुमारे आठ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विद्यानगर ते श्रीनगर या दोन्ही भागांना जोडण्यासाठी बलबलकाशी नाल्यावर अनेक वर्षांपासून छोटा पाइप टाकून पूल तयार करण्यात आला होता. यावरुन केवळ मोटारसायकल वापरत होती. पावसाळ्यात नाल्याला पूर येताच हा मार्ग बंद होत असल्याने दोन्ही भागांत वापरण्यासाठी जळगाव रोडवर यावे लागत होते. या ठिकाणी मोठ्या पुलाची गरज ओळखून माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज…