जळगाव ः प्रतिनिधी परिवर्तनची दहा वर्ष ही सांस्कृतिक स्थिंत्यतराची दशकपूर्ती असून जळगाव शहरातलं नाटक, संगीत, नृत्य , चित्र, साहित्य या सर्व कलांचा समुच्चय साधत उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती हेच परिवर्तनचे वैशिष्ट्य व उद्देश असल्याचे मत प्रास्ताविकात नारायण बाविस्कर यांनी परिवर्तन दशकपूर्ती उत्सवाच्या उपक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी राम पवार, संदीप पाटील, अपर्णा भट, विजय पाठक, चंदू नेवे आदी प्रमुख पाहुणे म्हणुनउपस्थित होते. दशकपूर्ती उत्सवाला अपर्णा भट यांच्या शिष्यांचा ’बहुरंगी यमन’ या कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाने झाली.प्रभाकर संगीत कला अकादमीच्या विद्यार्थींनी यमन रागातील गणेश वंदना, शिव वंदना, उई मा उई मा ये क्या हो गया, कभी आर कभी पार लागा तिर ए नजर, के…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आयोजित कोविड १९ लोककल्याणकारी योजनांचे पथनाट्य कार्यक्रम विलास बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून जिल्ह्याभरात विविध संस्थांच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला. समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु. यांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा बस स्थानकावर पथनाट्य सादर करुन जनजागृतीची सुरुवात केली.त्याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मधुकर जुलाल ठाकूर आरोग्य सेवक ,भाईदास बन्सी महानुभाव, बाबुलाल मुकूंदा पाटील, अशोक हिंमत पवार, मिलिंद अहिरे, प्रवीण अहिरे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.पथनाट्यचे प्रमुख योगेश लांबोळे, भावेश पाटील, संजना तायडे ,जयेश सोनवणे, कृष्णा बारी ,विशाल सदावर्ते, तेजस कोठावदे, महेश कोळी, अक्षय पाटील आणि विशाल जाधव यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जळगाव जनता सहकारी बँकेच्या कर्मचार्यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सहभाग नोंदवावा या हेतूने रु.३११०००/-रूपयांचा निधी फैजपुर मंदिर संस्थानाचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व श्रीराम मंदिर संस्थानचे श्रीराम महाराज यांना सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल राव, केशवस्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरतदादा अमळकर, बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला, केशवस्मृती प्रतिष्ठान चे सचिव रत्नाकर पाटील, संचालक सतिष मदाने, दीपक अट्रावलकर, कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, अधिकारी बापूसाहेब महाले, कपिल चौबे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, याकरीता प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणारे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत. जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह विविध…
जळगाव ः प्रतिनिधी रस्त्यावरील रहदारीसाठी अडथळा ठरत असणारे गणेश कॉलनीतल्या ख्वाजामिया चौकातील अतिक्रमण आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हटविण्यात आले. तगड्या पोलीस बंदोबस्तासह महापौर, आयुक्त व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती झालेल्या कारवाईने या चौकाचा श्वास मोकळा झाला आहे. सविस्तर वृत्त असे की,शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण आज पहाटे महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन गुरुवारी सकाळी…
जळगाव : प्रतिनिधी माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल जिल्हा मजूर फेडरेशनच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आप्पासाहेब गुलाबराव देवकरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.१३५ कार्यकर्त्यांनी याप्रसंगी रक्तदान केले तसेच म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देवकर आप्पांचे कार्यकर्ते खुशाल चव्हाण, सुजीत शिंदे व राजेंद्र पाटील यांनी ऑक्सिजन सिलेंडर व किट सप्रेम भेट दिले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव देवकर यांनी मजुर फेडरेशनचे संचालक व पदाधिकारी तसेच उपमहापौर सुनिल खडके, अशोक लाडवंजारी, अमित काळे, पिंटू काळे, सचिन पाटील,साईमतचे संपादक प्रमोद बर्हाटे, लकी टेलर, ज्ञानेश्वर महाजन, अतुल हाडा, शुचिता हाडा, सुनिल…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील ख्वाजामियाँ चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील अतिक्रमीत हॉटेल हटविण्याचे आदेश महापौर भारती सोनवणे यांनी बुधवारी दिले. शिवसेनेचे माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे यांनी यासंदर्भात महापौर सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महापौर सोनवणे यांनी हे आदेश दिले. अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्याने महापौर भारती सोनवणे यांच्याकडून शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. बुधवारी प्रभाग ७, ८, ९ मध्ये पाहणी दौरा करण्यात आला. या पाहणी दौर्याच्या सुरुवातीलाच महापौर सोनवणे यांनी ख्वाजामियाँ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बांधण्यात आलेल्या अतिक्रमित हॉटेलची पाहणी केली. यावेळी महापौरांनी अतिक्रमण निर्मुलन विभागाला तात्काळ हॉटेल हटविण्याचे आदेश दिले. दरम्यान, हॉटेल चालकाने ७ दिवसाची मुदत…
चाळीसगाव ः प्रतिनिधी येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये सायंदैनिक ‘साईमत’ दिनदर्शिकाचे प्रकाशन शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक निसार सैय्यद, सपोनि विशाल टकले, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर प्रतिक पाटील, चाळीसगाव न्यायालयाचे कर्मचारी किशोर पाटील, ‘दैनिक साईमत’चे उपसंपादक मुराद पटेल, योगेश बैरागी उपस्थित होते.
धरणगाव : प्रतिनिधी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फळ वाटप करण्यात आले. तसेच पी.आर. हायस्कूल येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथालय सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, डॉ. मिलींद डहाळे, तालुकध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, सिताराम मराठे, गोपाल पाटील, भुषण पाटील, आनंदा पाटील, सागर वाजपाई, पी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे, विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल ः प्रतिनिधी यंदा २०२०-२०२१ या वर्षाच्या खरीप हंगामात केंद्र शासनाकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे तूर खरेदी केंद्र यावल, उपअभिकर्ता संस्था म्हणून यावल तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत तूर खरेदीसाठी नावनोंदणीला आज २१ जानेवारी पासून शुभारंभ करण्यात आला आहे. हेक्टरी खरेदी१२ क्वींटल ३४ किलो व हमीभाव ६ हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे राहणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी आपले नाव नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, तुर पिकाचा ऑनलाईन चालू खरीप हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला ७/१२उतारा घेऊन संस्थेशी संपर्क करावा. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे,त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक…