जळगाव ः प्रतिनिधी राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्यकारीणीची मिटींग विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली होती. या मिटींगमध्ये राज्यातील आठही विभागातील खाजगी शिक्षणसंस्था चालक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम मागील मिटींगचे ईतिवृत्त मंजुर करण्यात आले. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या समस्यांवरती कार्यकारणीच्या सभासदांनी काही मागण्या ठेवल्यात. त्यात सर्वप्रथम शासनाने २०१९-२० व २०२०-२१चे वेतनेत्तर अनुदान खाजगी शिक्षण संस्थांना तात्काळ उपलब्ध करून द्यावे, ११ डिसेंबर रोजी शासनाने शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करतांना कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने मानधनावरती भरती प्रक्रिया करण्याचा जो निर्णय घेतला तो अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी,सरळसेवा पध्दतीने पद भरण्याची परवानगी शासनाने संस्था चालकांना द्यावी,केंद्र…
Author: saimat team
शेंदुर्णी ता.जामनेर ः प्रतिनिधी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काल शेंदुर्णी येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलला भेट देऊन कोरोना योध्दांचा सन्मान केला. येथील पाचोरा रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलमधील विशेष उपचार कक्षाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले .त्यानंतर त्यांनी रुग्णालयात रुग्णांसाठी अल्पदरात सुरू असलेल्या सेवांची माहिती घेत सर्व विभागांना भेट दिली व विशेष उपचार कक्षाचे उद्घाटन केले. डॉ.सागर गरुड यांनी कोरोना काळात मोफत अन्नधान्य वितरण, बारामती पॅटर्नवर आधारित घरपोच जेवणाचे डबे वितरण व कोरोना काळात मोफत औषध उपचार याबाबत माहिती घेत त्यांचा सत्कार केला. यानंतर शेतकर्यांच्या अडचणी समजून संबंधित अधिकार्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डॉ. सागर गरुड, डॉ. भूषण मगर,डॉ.विनोद परदेशी, राष्ट्रवादी…
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहेत.या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ विवेक सोनवणे यांनी वेळोवेळी निवेदने देऊन दिव्यांग बांधवांच्या समस्या शासनदरबारी मांडल्या.त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी विविध कार्यालयांना आदेश दिले परंतु अद्यापही दिव्यांग बांधवांपर्यंत सदरच्या शासकीय योजना पोहोचू शकलेल्या नाहीत.त्याचा निषेध म्हणून प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी जळगाव येथील स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिव्यांग बांधवांचा भव्य जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ.विवेक सोनवणे यांनी केले आहे . दरम्यान या संदर्भात डॉ सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे वीस जानेवारी रोजी…
शेंदुर्णी, ता.जामनेर ः वार्ताहर रोहीत दादा विचार मंचचे प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार उद्या रविवारी दुपारी २.३० वाजता शेंदुर्णी येथे भेट देणार असून येथील पाचोरा रोड वरील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. आ.रोहीत पवार शेंदुर्णी येथील सागर गरुड यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे दुपारी २.३० वाजता येणार आहेत. यावेळी रुग्णांची विचारपूस कोरोना काळात योध्दांनी केलेली कामगिरी याबाबत माहिती घेणार आहे. सर्व प्रथम ते कजगावला येऊन ११ वाजता विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहे. त्यानंतर १२ ते २ वाजेपर्यंत पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे कामकाज पाहून कार्यकर्त्यांच्या व रोहित पवार विचार मंचच्या कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहे.…
भुसावळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्चला भुसावळ स्पोर्टस अॅन्ड रनर्स असोशिएशनतर्फे महिलांसाठी रनचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मर्यादित महिलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तीन, पाच व दहा किमी अंतरासाठी रनचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारूलता पाटील यांनी दिली. सुशिलाबाई नामदेव फालक विद्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन झाले. यावेळी भुसावळ स्पोर्टस अॅन्ड रनर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रा. प्रवीण फालक, प्रवीण पाटील, डॉ. तुषार पाटील, डॉ. निलीमा नेहेते, डॉ. चारूलता पाटील, गणसिंग पाटील, रणजित खरारे, प्रवीण वारके आदी उपस्थित होते. माहिती देतांनाडॉ. चारूलता पाटील, डॉ. नीलिमा नेहेते. प्रा…
बोदवड ः प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ वा जयंतीसोहळा बोदवडला सामाजिक उपक्रम घेत साजरा करण्यात आला. यावेळी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, तालुका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक कलीम शेख, गोपाल पाटील, विनोद पाडर तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, राजेश नाणवाणी, कैलास जावरे, नगरसेवक अनिल खंडेलवाल, आनंदा पाटिल, सुनिल बोरसे, विजय पालवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ.उध्दव पाटील, ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील, निना पाटील, तसेच पत्रकार जिया शेख, सुहास बारी, शिवसैनिक हर्षल उगले, विलास माळी, रंजन पाटील, प्रेम जाधव, कैलास सुर्यवंशी, दिपक खराटे, संजु भोई आदि…
जळगाव : प्रतिनिधी परिवर्तन दशकपूर्ती उत्सवाच्या दुसर्या नव्वदोत्तर मराठी साहित्यातील कवी अशोक कोतवाल यांच्या साहित्याचा शोध परिवर्तनच्या कलावंतांनी अभिवाचनातून घेतला. ‘नुसताच गलबला’ या त्यांचा गाजलेल्या कविता संग्रहाचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. सामाजिक जाणिवांच्या कविता लेखनाने स्वतंत्र ओळख निर्माण करणार्या कोतवालांच्या कवितांनी रसिक अंतर्मुख झाले. सहजसोपी पण आशयगर्भ कविता लिहिणारे अशोक कोतवाल आजच्या पिढीला विचार करायला भाग पाडतात. त्याच्या ’फ्रॉक, मुलं वाद घालताहेत, शिक्षकाची कैफियत, मी गोष्ट करतो तेव्हाची, इश्वर, कॉमन मॅन, पाणी खेळवतंय, पाणी, मोनालिसा, बोलू द्यावं कुणालाही कशावरही, मुली, मधल्या सुट्टीत पळून जाणारी मुले’ या कवितांचे प्रभावीपणे अभिवाचन परिवर्तनच्या कलावंतांनी केले. यात नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे, वर्षा चोरडिया,…
चाळीसगाव ः प्रतिनिधी चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करण्यात यावे, अशी मागणी मान्य न झाल्यास शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव हरी खलाणे दि.२६ जानेवारी रोजी चाळीसगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. चाळीसगाव तालुक्यात उपप्रादेशिक कार्यालय होण्यासाठी २००७ पासून माझा सतत शासनाकडे पत्रव्यवहार करत आहे. २०२१ उजाडले आहे. तरी देखील कोणीही दखल घेतली नाही. तसेच महसूलबाबत चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व पारोळा या चार तालुका मिळुन महिन्याला साडेपाच कोटी महसूल मिळत असतो म्हणून शासनाचे देखील नुकसान नाही. चाळीसगाव हा तालुका जळगाव पासून शंभर कीलो मीटर आहे तसेच चार जिल्ह्याचे ठिकाण आहे व दोन राज्यांची सीमा देखील जवळ आहे.…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र शासनाने बनविलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करावे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व शेतकरी तसेच मध्यमवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेले विज विधेयक रद्द करावे, या मागण्यांसाठी छावा मराठा युवा महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संयुक्त किसान मोर्चाअंतर्गत १८ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत विविध संघटनातर्फे कृषी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २२ रोजी आंदोलनाचा ५ वा दिवस होता. घोषणांनी दणाणला परिसर यावेळी आंदोलकांनी जय जवान जय किसान, किसान बचाओ देश बचाओ, संविधान बचाओ देश बचाओ, लडेंगे जितेंगे आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी अमोल कोल्हे, मुकुंद सपकाळे, फारुख शेख, हरिश्चंद्र सोनवणे,…
जळगाव ः प्रतिनिधी राज्य शासनाने १४ जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिवसेना महानगरतर्फे शासकीय कार्यालयांमध्ये २३ जानेवारी रोजी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यासाठी काल संध्याकाळी प्रतिमा भेट देण्यात आल्या. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ जानेवारी रोजी परिपत्रक काढून त्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा देखील उल्लेख केलेला आहे. त्यानुसार शनिवारी दिनांक २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्याकरिता शहरातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये शिवसेना महानगर तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा सदिच्छा भेट देण्यात आल्या. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस…