पाचोरा ः प्रतिनिधी पाचोरा शहर व तालुक्यातील ५० सेवानिवृत्त सैनिकांनी कोरोना काळात मोफत सेवा दिली होती.या सैनिकांचे ऋण फेडण्यासाठीयेथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना योद्धा व पत्रकार बांधवांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव नुकताच करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र मोरे, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळु पाटील हे यांची विशेष उपस्थिती होती. पाचोरा येथील पोलिस…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटी आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत रिंगरोडवरील डॉ. शिरीष चौधरी यांच्या आस्था हॉस्पीटल येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दुभंगलेले ओठ, टाळू, टाळूला शस्त्रक्रियेनंतर राहिलेले छिद्र, तिरपे राहीलेले नाक व्यवस्थीत करणे, आवाज व्यवस्थीत करण्यासाठी शस्त्रक्रिया व या संबंधीत सर्व समस्यांविषयी मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गरज असलेल्या सर्व रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी भूल देणे, औषधी, रक्त तपासणी पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांची राहण्याची व जेवणाची सुद्धा…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील समस्त प्राधान्य लाभार्थी व अंत्योदय कार्डधारकांनी आपल्या संबंधीत रेशन दुकानावर जावून आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरुन देणे सुध्दा आवश्यक आहे. जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटना मर्यादित, जळगाव यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील समस्त कार्डधारकांनी आपल्या संबंधीत रेशन दुकानाजवळ आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे व आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरुन देण्याचे करावे.सदर हमीपत्र संबंधित रेशन दुकानदाराजवळ उपलब्ध असल्याचेही म्हटले आहे. तसेच एपीएल,केशरी आर.सी.१२ अंकी नंबर नसलेल्या कार्डधारकांसाठी माहे जुलै, ऑगस्ट…
अमळनेर ः प्रतिनिधी राजवड (ता.पारोळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका, समाजसेविका, शिक्षक नेत्या डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांना वल्लरी फाऊंडेशन तेलंगणाकडून ‘स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड २०२१’ ने सन्मानित करण्यात आले. डॉ.पाकिजा पटेल यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक पर्यावरण विषयक कामाने समितीने पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गेल्या २० वर्षापासून सतत सर्वोत्कृष्ट कार्य सुरू असून नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढी घडावी व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी पोहोचावा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अध्यापनाचे कार्य निरंतर सुरू आहे. याची दखल घेऊन उंच भरारी डॉ.पटेल यांनी घेतली आहे. विद्यार्थी हा सुजान संस्कारशील घडावा यासाठी नेहमी प्रयत्न सुरू असतात. या…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांसाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. जुना सतारे भागातील वेडीमाता मंदिर परिसरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात सकाळी सुमारे ११.४५ वा.पहिल्या न.पा.आरोग्य विभागातील कर्मचार्याला कोविशिल्डची लस देण्यात आली. दरम्यान, सकाळी खा.रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.डॉ.सुनिल नेवे आदींनी आरोग्य केंद्रात येवून भेट देत नियोजनासंदर्भातील माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात मार्च २०२० ला कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याच्या मोहिमेला अखेर आज सुरुवात झाली. देशपातळीवरील मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात एकाच वेळी ७ ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दररोज शंभरप्रमाणे…
यावल ः प्रतिनिधी शहरातील एका दुचाकी चोरट्याने मोटर सायकल चोरून त्याच मोटरसायकल मालकाशी संपर्क साधून तुमची मोटरसायकल कोणाकडे आहे, हे मला माहिती असून तुम्ही दोन हजार किंवा पाच हजार रुपये दिल्यास मोटर सायकल आणून देतो असे सांगून संबंधित मोटरसायकल मालकाची आर्थिक पिळवणूक सुरू केल्याचा नवा फंडा यावल शहरात दुचाकी चोरट्याने सुरू केला आहे. या दुचाकी चोरट्या संदर्भात यावल पो.स्टे.ला तक्रार करण्यात आली असली तरी तो दुचाकी चोर फरार असल्याने यावल पोलीस हतबल ठरत असल्याचे शहरात बोलले जात आहे. गेल्या दोन महिन्यात एका एसटी कर्मचार्यांची प्लेटिना मोटरसायकल चोरीस गेली होती, दुचाकी चोरट्याने मोटर सायकल मालकाशी डायरेक्ट संपर्क साधून मोटरसायकल कोणाकडे आहे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात संथगतीने असलेले मतदान आता जोर धरू लागले आहे. जिल्ह्यातील ५ हजार १५५ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या १३ हजार २४७ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद होत आहे.जिल्ह्यातील २ हजार ४१५ केंद्रांवर १३ लाख ४ हजार ९२३ मतदार आपला कौल नोंदवित आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यात १८१ तर नंदुरबार जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. आज सकाळी ७.३० वाजता जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. ७.३० ते ९.३० या पहिल्या टपप्यात मतदान संथगतीने सुरू होते. मात्र त्यानंतर मतदान केंद्रांवर हळूहळू पुरूष व महिला मतदारांची रीघ लागल्याचे दिसून आले.…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापनदिन साजरा करत नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, रमेश सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या जनाधन मावाळे, पोचीराम कांबळे, सुहासिनी बनसोळे, गौतम वाघमारे, दिलीप रामटेके, आदी भीमसैनिकांना आदरांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० साली औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मराठवाडया सारख्या मागासलेल्या प्रदेशाला शिक्षणाची व्यवस्था करून दिली व हैदराबादवर अंवलबून असलेल्या मराठवाड्यात शैक्षणिक क्रांतीला सुरुवात झाली. बाबासाहेबांच्या या शैक्षणिक प्रयत्नामुळेच १९५८ साली…
जळगाव ः प्रतिनिधी संपूर्ण देशात ज्या अभियानाची जय्यत तयारी सुरु आहे, अशा श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाने व्यापक स्वरूप घेतले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील सर्वच भागात अभियानाची तयारी पूर्ण झाली आहे. मकरसंक्रांतीचे मुहूर्त साधत श्रीराम नगर वस्ती येथे निधी समर्पण अभिनयान कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा निधी अभियान प्रमुख देवेंद्र भावसार, भवानी मंदिराचे पुजारी महेशकुमार त्रिपाठी, श्रीराम मंदिराचे श्रीराम महाराज, कमलाकर बनसोडे, गोविंद सोनवणे, मुकुंदमहाराज धर्माधिकारी व श्रीराम नगर प्रमुख बंटी बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविकता योगेश दहाड यांनी करत सांगितले कि श्रीराम नगर वस्तीत बळीरामपेठ, शनिपेठ, जुनेगाव परिसरासह एकूण दहा प्रमुख वस्ती येतात. यात अभियानाच्या प्रचारासाठी…
जळगाव ः प्रतिनिधी तेरापंथ महिला मंडळातर्फे हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आनंददायी जीवनावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शोभा देवी बैद आणि मंजू देवी बैद उपस्थित होत्या. कार्यक्रमात मंडळातील नववधू सदस्या पिंकी छाजेड आणि निशिता डागा यांनी सर्वांना हळदी कुंकू लावून तिळगुळाचे लाडू देत स्वागत केले. कार्यशाळेची सुरूवात सामूहिक नवकार मंत्राचा जप करून करण्यात आली. मंडळातील सदस्या सुनीता चोरडीया, जयश्री लोढा प्रिया छाजेड आणि हिमांशू सेठिया यांनी सुमधूर आवाजात गीत सादर केले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात झालेल्या खान्देशस्तरीय संवर्धन कार्यशाळेच्या यशस्वी आयोजना संदर्भात अखिल तेरापंथ महिला मंडळातर्फे प्राप्त संदेशाचे मंत्री रीटा बैद यांनी वाचन केले. निर्मला…