जळगाव ः प्रतिनिधी येथील खान्देश उर्दू कौन्सिलतर्फे दैनिक उर्दू टाइम्सचे निवासी संपादक फारुक अन्सारी यांना निर्भीड पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उर्दू पत्रकारांच्या मेळाव्यात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. अन्सारी हे ३३ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी पत्रकारितेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी कौन्सिलचे अध्यक्ष अकिल खान ब्यावली, सचिव सइद पटेल यांनी फारुक अन्सारी यांनी पत्रकारिता व आपल्या लेखनीद्वारे समाज व राष्ट्रहितासाठी, रंजलेल्या गांजलेल्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी केलेल्या निर्भीड तसेच राष्ट्र घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी निर्भीड पत्रकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याचे सांगितले. आपल्या सत्काराला उत्तर देताना फारुक…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया यांना सन २०१२ पासून ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती पत्रिका माहिती व जनसंपर्क विभागाने मंजूर केली होती.या महिन्यात माहिती व जनसंपर्क विभाग मुंबई यांच्याकडून नूतनीकरण होऊन अधिस्वीकृती पत्रिका जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्याकडे आली होती. ती अधिस्विकृती पत्रिका त्यांनी काल संध्याकाळी अशोक भाटिया यांच्या निवासस्थानी स्वतः जाऊन सन्मानाने श्री. भाटिया यांना प्रदान केली. या प्रसंगी जिमाकाचे माजी कर्मचारी सुरेश सानप, श्री. सोनवणे, अरुण नेवे, ज्येष्ठ पत्रकार जमनादास भाटिया, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस रितेश भाटिया, सारंग भाटिया, दीपक भाटिया, ललिता आशर, शितल भाटिया, सोनाल पाटील, ज्योती भाटिया, शोभा भाटिया,सिद्धी…
पाचोरा ः प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की अनेक गमतीदार किस्से घडत असतात.या निवडणुकीत गावच्या व परिसरातील पुढार्यांची प्रतिष्ठा पणाला लागत असते.एखाद्या निवडणुकीत सासू विरुध्द सून अशी लढत होते तर काही गावात भावजय-नणंद एकमेकांसमोर उभे राहतात.एवढेच नव्हेतर काही ठिकाणी पती- पत्नी यांच्यात लढत रंगते मात्र पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पती-पत्नीने वेगवेगळ्या प्रभागातून नसिब अजमावले व निकाल लागल्यानंतर त्या दोघांना नशिबाने साथ दिसल्याचे स्पष्ट झाले. डोंगरगाव येथील पंढरीनाथ मागो सावळे ( पाटील) व सौ.रत्नाबाई पंढरीनाथ सावळे ( पाटील ) हे पती-पत्नी दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूकीत निवडून आले आहेत. यावरच डोंगरगावसह तालुक्यातील सर्व राजकिय पक्षात व शिवसेनेचे आ. किशोर पाटील राष्ट्रवादीचे माजी…
भुसावळ : प्रतिनिधी समाजात विविध प्रकारची बांधीलकी असते. मात्र, ती जोपासतांना वर्तमान स्थितीचे भान राखावे लागते. त्याचवेळी समाजात केलेल्या कार्याचा नक्कीच आदर होतो. असेच सामाजिक बांधीलकी व वर्तमान परिस्थितीचे भान राखत रीती व परंपरा जोपासत लोणारी परिवाराने यंदाही सालाबादाप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला. यंदा त्यांनी प्रभागातील प्रत्येक नागरीकांच्या घरी जात संक्रातीचे वाण व तिळगुळ वाटप करून हा सण साजरा केला. देशात कोरोनाचे संकट अद्यापही शमले नाहीत. मात्र सण-वार, चाली-रिती जोपासणे आपले कर्तव्य आहे. शहरातील भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा माजी शिक्षण समिती सभापती मिना लोणारी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी व परिवारातर्फे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा नियोजन भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, शल्यचिकीत्सक नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, उपप्रादेशिक…
जळगाव : साईमत चमूकडून जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर सुरुवात झाली. अगदी सकाळपासून मतमोजणी केंद्रावर ग्रामीण भागातून लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. आज सकाळी जळगाव येथील नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली. भादली येथील बहुचर्चीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांनी विजय संपादीत करत त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांना बोदवड तालुक्यातील मनुर या आपल्या गावी पुतण्याच्या पराभवाने धक्का बसला आहे. तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आव्हान उभे करणार्या अंजली पाटील यांनी विजय मिळविला आहे. वार्ड क्रमांक ४ मधून तृतीयपंथी अंजली पाटील…
जळगाव ः प्रतिनिधी येथील शिवाजीनगरातील खडके चाळ येथील झाशीची राणी महिला मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी सुनीता अनिल चौधरी, उपाध्यक्षपदी भाग्यश्री हर्षल बाविस्कर तर सरचिटणीसपदी रंजना डिगंबर कोळी, सचिवपदी वैशाली चंद्रकांत इंगळे, सदस्य म्हणून कविता संतोष सोनवणे, आशा मनोज मोरे, अलका संजय मिस्तरी, वर्षा मंगल पाटील, शोभा अशोक झुंजारराव, भारती दिलीप सोनवणे, नंदा युवराज सोनवणे, रेखा प्रदीप तायडे, वंदना नारायण रायसिंगे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला तसेच वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष वाढवण्याची जबाबदारी देखील महिला मंडळाने घेतली. त्यानंतर हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव वैशाली चंद्रकांत इंगळे यांनी तर आभार…
भुसावळ : प्रतिनिधी शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. त्याबद्दल जास्तीत जास्त शेतकर्यांना आणि शेतकामगारांना माहिती व्हावी, त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी झटून प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले होते आणि त्याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी त्यांच्या कृतीद्वारे दिला आहे, असे प्रतिपादन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ.गिरीश महाजन यांनी केले आहे. वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे दोन दिवसीय निवासी प्रमुख पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर हे मुंबई येथे रामभाऊ…
चाळीसगाव ः प्रतिनिधी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र राज्य व विभागीय शाखा नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने लुई ब्रेल यांच्या जयंती निमित्त चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील भूषण मंगल कार्यालयात आयोजित विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धांचे उद्घाटन आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विद्यालयाचे प्रा.डॉ.एस.आर.जाधव, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे जनरल सेक्रेटरी डी.पी.जाधव, चाळीसगाव अंधशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रभा मेश्राम, वकील संघाचे अध्यक्ष ऍड.पी.एस.एरंडे, रयत सेनेचे गणेश पवार, दृष्टिहीन संघाचे चाळीसगाव शाखाध्यक्ष साहेबराव पगारे, रोटरीचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, प्रमोद शिंपी, संजय घोडेस्वार, आनन शिंपी, संभाजी सेनेचे लक्ष्मण बापू शिरसाठ, बालू पवार आदी उपस्थित होते. यावेळी उद्घाटनपर संवाद…
जळगाव : प्रतिनिधी उपमहापौर सुनिल खडके यांच्या प्रेरणेने आज शहरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन रॅलीमध्ये २०० सायकलपटूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या सर्व सायकलपटूंनी नियोजित १० कि.मी.चे अंतर पूर्ण केल्यामुळे सर्वांचा महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. जनतेमध्ये सायकलींगची आवड निर्माण व्हावी व वाढावी या उद्देशाने उपमहापौर सुनिल खडके यांच्या प्रेरणेने सायक्लोथॉन (सायकल फेरी) आयोजित करण्यात आली. तिचा प्रारंभ आज सकाळी ७ वाजता शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉफ येथून महापौर भारतीताई सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. या सायकल फेरीचा मार्ग…