Author: saimat team

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले. महावितरणाच्या या कृतीच्या निषेधार्थ काल रोजी धरणगाव तालुका भाजपाने महावितरण केंद्रांवर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. भारतीय जनता पार्टीचे नेते पी.सी.आबा पाटील यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या, राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा,फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकर्‍यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही,असे सांगितले व महावितरण कार्यालयांना टाळे ठोकले. तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा बँकेसाठी भाजपने सर्वपक्षीय पॅनलची तयारी चालवली असताना राष्ट्रवादीने देखील महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही निवडणूक लढविण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा दौर्‍यावर येत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठीचे नियोजन निश्‍चित केले जाणार आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅनलकडूनच ही निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. भाजपने सर्वपक्षीय पॅनलसाठी विरोधी पक्षातील काही संचालक आणि इच्छुक उमेदवारांशी संवाद सुरू केलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने देखील सावध पवित्रा घेत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या चर्चेला प्रारंभ केला आहे. पुढील आठवड्यात ११ रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात चर्चेनंतर पॅनल निर्मितीचा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री.चव्हाण बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक व कायदेशीर बाबींचे पेच आहेत. हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मराठा आरक्षण व देशातील इतरही अनेक राज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने…

Read More

यवतमाळ: आदिवासी किंवा इतर पारंपरिक वननिवासी हे सुरुवातीपासूनच जंगलांचे संवर्धन करीत आले आहेत. मात्र त्यांना ना हक्काची जमीन, ना सातबारा. केवळ जमीन वाहणे आणि त्यावर उदरनिर्वाह करणे एवढेच त्यांना माहित. आता मात्र शासनाने आदिवासींना वनपट्ट्यांचे मालकी हक्क दिल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. परिणामी या वनहक्क पट्‌ट्यांमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल, असे मत राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात 67 आदिवासी लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप करताना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक एन. रामाराव, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपवनसंरक्षक केशव…

Read More

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : राज्यातील शेतकरी सदैव स्वत:च्या पायावर उभा राहावा. शासनाची मदत  घेण्याची वेळसुध्दा त्यावर येऊ नये या भावनेतून शेतकऱ्यांचे हात सदैव बळकट करण्यासाठी कृषी विभागाने काम करावे. बाजारात जे विकले जाते ते शेतकऱ्याने पिकवावे, जे विकेल ते पिकेल या संकल्पनेवर कृषी विभागाने काम करावे. राज्यातील विविध ठिकाणी करण्यात येत असलेल्या शेतीची माहिती शेतकऱ्यांना कळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शन घेण्यात येईल. असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले. जत येथे आयोजित माळरान कृषी व पशु प्रदर्शन, कृषी सन्मान सोहळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला व बाल विकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सिंह सावंत,…

Read More

ठाणे : शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी २७६ कोटी रुपयांच्या भावली धरणाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी येत्या १५ दिवसात निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच पुढील अडीच ते तीन वर्षात ही योजना पूर्ण करून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देऊन प्राधान्याने त्या योजना मार्गी लावण्याचे  निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष…

Read More

जळगाव ः  सुकदेव शिरसाळे महापालिका उपायुक्त संतोष बाहुळे सध्या शहरातील अतिक्रमण धारकांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत.शहर अतिक्रमणमुक्त करण्याची त्यांची व प्रशासनाची कारवाई निश्चितच स्वागतार्ह म्हटली जाते परंतु सदर कारवाई करतांना छोट्या व्यावसायिकांवर अन्याय तर मोठ्यांना अभय असे चित्र दिसत असल्याने  हातावर पोट भरणारात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे .शहरातील बेसमेंटचा व्यापारी उपयोग करणार्‍या संकुलांचा विषय थंड बसत्यात पडल्याने मोठ्यांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. जळगाव शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्याच वेगात वाढत चाललेली वाहनसंख्या व त्या तुलनेत वाहन तळांचा अभाव यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होणे नित्याचेच झाले आहे.त्यातच सर्व प्रमुख रस्ते,रस्त्यांच्या दोन्ही बाजू व सर्वच चौकांना…

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील सामनेर येथे पाचोरा जळगाव हायवे रस्त्यावर आज पहाटे ५ : ३० वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशदारासमोर दोन महिला पायी मॉर्निग वॉक करुन परतत असतांना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे सामनेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील महिला रोज मॉर्निंग वॉकला जात असतात. आज पहाटे  साडे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे  मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज पुरुष व महिला सकाळी मॉर्निंग साठी गेले होते. यावेळी सकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनिषा साहेबराव…

Read More

पाचोरा : गणेश शिंदे तालुक्याला लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्यातून धावणार्‍या पी.जे रेल्वे मार्गाचा रुंदीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेवून याबाबत नवीन अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या निर्णयामुळे सोयगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे. सोयगाव परिसरातून फास्ट मुंबईला जाण्यासाठी आधार ठरलेली पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन अर्थसंकल्पात या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे आता पाचोरा-जामनेर पी.जे रेल्वे अधिक जोरात होणार असल्याने सोयगावकरांचा मुंबई प्रवास अधिक फास्ट होणार आहे. पाचोरा आणि जामनेर या दोन तालुक्यांना जोडणारा पी.जे रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्यात येणार आहे. पाचोरा-जामनेर ही पी.जे रेल्वे सोयगाव तालुक्याच्या सीमारेषेवरून धावते त्यामुळे या…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नंदलाल मराठे तर जिल्हा सरचिटणीसपदी संजीव शिरसाठ यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांनी सदर निवडीचे पत्र दिले असून सन-२०२३ पर्यंत ही नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेली २१ वर्षांपासून नंदलाल मराठे हे कार्यरत आहेत.चोपडा तालुका पत्रकार संघ,जिल्हा पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र पत्रकार संघ आदी संघटनेत त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांनी सदरील निवड केली आहे. संजीव शिरसाठ यांनी देखील दीर्घकाळ पत्रकारिता केली असून…

Read More