Author: saimat team

नाशिक :- समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री. यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. सटाणा येथे देवमामलेदार श्री. यशवंत महाराज स्मारक नूतनीकरण समारंभ प्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दीघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड,…

Read More

मुंबई:-  कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालये जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू आहे. अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन व तत्सम योजनांचा लाभ विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास आर्थिक सहाय्य मिळावे या दृष्टीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या विविध योजना सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविल्या जातात. राज्यातील बहुतांश महाविद्यालयात सध्या कोविडमुळे विद्यार्थी डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत. २०२०-२१ या वर्षी नूतनीकरणासह नवीन अर्ज महाविद्यालय स्तरावरून सामाजिक न्याय…

Read More

 एअरटेल युजर्सला आता आणखी सावध राहण्याची गरज आहे. नुकताच एक रिपोर्ट आला असून यात एअरटेलच्या नंबर्सचा डेटा लीक झाला आहे. यात युजर्संचे नंबर, नाव, पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर, महिला-पुरूष यासारख्या माहितीचा समावेश आहे. हॅकर्सने २.५ मिलियन म्हणजेच २५ लाख युजर्संचा डेटा आपल्याकडे ठेवला आहे. हॅकर्सच्या म्हणण्यानुसार, त्याच्याकडे भारतातील सर्व एअरटेल युजर्सचा डेटा आहे. व त्याला विक्री करायचा आहे. जर असे झाले तर एअरटेल युजर्स साठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. IANS च्या रिपोर्टनुसार, डेटा डंप च्या डिटेल्सला व्हेरिफाय करण्यात आले आहे. ज्यात अनेक नंबर्स एअरटेल युजर्सचे आहेत. इंटरनेट सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी ही माहिती दिली आहे. हॅकर्सने एअरटेल सिक्योरिटी टीम सोबत…

Read More

जळगाव  :  प्रतिनिधी येथील गांधी रिसर्च फाऊण्डेशन आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय मधुमक्षिका पालन व मध संकलन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बोरअजंटी लगत असलेल्या परिसरातील सुमारे 60 शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेत लाभ घेतला. आदिवासी शेतकरी बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचवावे हा सुद्धा त्यामागील हेतू होता. यावेळी मुख्य प्रशिक्षक विद्यानंद अहिरे, आत्माचे उप संचालक कुरबान तडवी, डॉ. वैभव सूर्यवंशी किरण जाधव, डॉ. विशाल बैराग, महेंद्र साळुंखे, उपसरपंच ज्ञानेश्वर सुलताने आदिंची प्रमुख उपस्थीती होती. सातपुडा पर्वतासारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणून मधाची भूमिका महत्त्वाची असते. थोड्याफार प्रमाणात त्याची विक्री करुन ते आपला…

Read More

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठ्या नेत्यांनी सोडचिट्ठी दिली . या  पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली.या सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कुठे तरी कमी पडल्याचे चित्र आहे . या  पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे. कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश…

Read More

मुंबई :-  कोरोनानंतर लवकरच आम्ही पुन्हा नाइट लाइफ सुरू करणार आहोत, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाइट लाइफ देखील लवकरच सुरू करू, असे पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत गेल्या वर्षी २६ जानेवारीला नाइट लाइफ संकल्पना अंमलात आणण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन केल्याने नाइट लाइफ सुरू होताच बंद झाले. मात्र आता ते पुन्हा सुरी करण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांनी सुरू केल्या आहेत. आता आपण रेस्टॉरंटला १ वाजेपर्यंत सुरू…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अभाविपतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालय उघडण्याकरिता काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. कोविडच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च २०२० पासून संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालये बंद आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. साधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात  महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील असे अपेक्षित असतांना अद्यापही प्रत्यक्ष शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा, त्याची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करून शासन झोपेचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना’ म्हटले की अजूनही संमिश्र भावना जागी होते कारण कोणाला हे संकट तर कोणाला ती संधी वाटते. गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रातही ऑनलाईनचीच चर्चा होती.जळगावच्या देवेश भय्या या अवघ्या १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने पालकांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत १२ सुवर्णपदके प्राप्त करीत जणू विक्रमच केला आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने ८०० पैकी ८०० गुण मिळवित ग्रँड ऑनर ऍवार्ड मेडल’ प्राप्त करीत १२ व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथमध्ये स्थान मिळविले आहे.थायलंड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेल्या सुनील झंवरचा मुलगा सूरज गेल्या दहा दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. सूरजकडून मिळालेली महत्त्वाची कागदपत्रे, माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे यांचे कोरे लेटरपॅड झंवरच्या कार्यालयात मिळून आल्याची बाब समोर आली आहे. बीएचआर घोटाळाप्रकरणी पुण्यात दाखल तीन गुन्ह्यांपैकी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सूरज झंवर याला २२ जानेवारी रोजी जळगावातून अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी सूरजला मंगळवारी न्यायालयात हजर केलेे. सूरज याच्याकडून गुन्ह्याशी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र, पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. संशयित आरोपी सुनील झंवर, जितेंद्र कंडारे,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील सुप्रसिध्द सर्जन तथा स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची सर्जन ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. सर्जन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चाप्टर ऑफ असोसिएशन या संस्थेची नुकतीच निवडणूक पार पडली. यात स्वामीनारायण हॉस्पीटलचे संचालक डॉ. स्नेहल फेगडे यांची कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली. ही निवड जळगाव, धुळे, नंदुरबार व नगर या जिल्ह्यांमधून करण्यात आली आहे. डॉ. स्नेहल फेगडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्याकडे आजमितीस जळगाव येथील आयएमएच्या सचिवपदाचीही जबाबदारी आहे. डॉ. स्नेहल फेगडे यांची जळगावातून प्रथमच निवड झाली आहे. असोसिएशनचे आगामी ७ व ८ फेब्रुवारी…

Read More