Author: saimat team

अमळनेर ः प्रतिनिधी अमळनेर येथील मुंदडानगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने दि.१५ ते २० फेब्रुवारी दरम्यान अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. असे गजानन महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता गजानन महाराज मंदीर मुंदडा गेटच्या समोर अमळनेर येथून पायी वारीची सुरुवात होईल. त्याअगोदर सकाळी ५ वाजता महाआरती होईल. दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळचा नाश्ता व चहा दिलीप पाटील, रवी भोई, श्याम मोहन हॉटेल पंचवटी, लाडू प्रसाद अरुण साळुंखे, गोपाळ कुंभार, शालिक आधार काटे, भाऊसाहेब पाटील यांच्यातर्फे केले जाणार आहे. दुपारचे जेवण गौरव अंबादास…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अंजुमन तालीमुल मुस्लिमीन, मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्ट व नॅशनल स्पोर्ट्स क्लब जळगावचे अध्यक्ष, ईकरा सोसायटीचे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अल्पसंख्यांक समाजाचे माजी अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांना नुकतीच ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी, चेन्नई तर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. काल संध्याकाळी त्यांचे जळगावात  आगमन होताच  जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष सय्यद चाँद,जळगाव शहराचे सचिव सलीम मोहम्मद यांनी त्यांचे शाल व बुके देऊन स्वागत-सत्कार केला. यावेळी मुस्लीम इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनीस शाह हे सुद्धा  उपस्थित होते. मलिक यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परराज्य विद्यापीठाने पीएचडी देणे हा एक प्रकारे जिल्ह्याचा नव्हे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील वरची आळीतील रहिवासी सुनिल दगडू महाजन यांची महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या जळगाव ग्रामीण तालुकाध्याक्ष्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली नुकत्याच जळगाव येथील सहकार बोर्ड जिल्हा बैठकीत  महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शामराव पाटील सर  यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. सुनिल महाजन या आधी नशिराबाद शहर उपाध्यक्षपदी व तालुका युवक अध्यक्षपदावर कार्यरत असतांना त्यांच्या कामाची गती व सामाजिक बांधिलकी पाहून त्यांना जळगावग्रामीण तालुकाध्याक्षपदाची सर्वानुमते संधी देण्यात आली. यावेळी प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर, ज्ञानेश्वरभाऊ महाजन, आत्माराम माळी, डॉ.नलिन महाजन, प्रेरणा महाजन,माजी सरपंच विकास पाटील,भीमराव महाजन यांच्यासह एस.बी., आर.एस. ग्रुप सोबत माळी  समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

Read More

जळगाव ः  प्रतिनिधी  घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता शासनाच्यावतीने अर्थसहाय्य देण्यात येते.आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी, यासाठी मिनाबाई पाटील अहिरे, वंदना पाटील वाकटुकी, सुमनबाई प्रकाश पाटील, रोटवद यांना  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख रूपयांच्या धनादेशाचे, पिठाची गिरणी व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. २० महिलांना धनादेश वाटप धरणगाव तालुक्यातील पाळधी बु., जुनागड बंगाली अहिरे बु, साकरे, बांभोरी प्र.चा. वाघळूद खुर्द, वराड बु., बोरगाव बु., पिंप्री खुर्द,  हनुमंतखेडा, पिंपळेसिम व धरणगाव येथील २० महिलांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी ३० हजार रुपयांचा धनादेश याप्रमाणे ६ लाखाचा धनादेश, एक महिन्याचे…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुका हा संतांची भूमी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात व जगात ख्याती असलेला म्हणून ओळखला जातो तसेच जनता कोरोनाच्या संकटातून बाहेर येत नाही तोच ब्लड फ्लूच्या रोगाने तोंड वर काढलेले आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धामुक्ताईनगर शहरामध्ये खुलेआम मासे विक्री केली जात आहे. मागील ग्रामपंचायतच्या काळामध्ये लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतने या मास विक्री व मटन विक्री करणार्‍यांसाठी व्यापारी संकुल जुने गाव येथील आठवडे बाजारात बांधले आहे. परंतु ते मटन मार्केट शो-पीस म्हणून ठरत आहे काय? असा प्रश्न मुक्ताईनगर शहरातील, तालुक्यातील व राज्यातील येणार्‍या भाविक भक्तांना पडलेला आहे. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत मास विक्रेत्यांवर थातूरमातूर नोटिसा काढून पुढील कारवाई मात्र…

Read More

यावल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या दडपशाहीमुळे देशातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या काळ्या कायद्याला तात्काळ रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी बांधव आंदोलनास बसले आहेत. त्यांना पाठबळ व पाठींबा देण्यासाठी यावल येथे यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष तथा आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले. यावल येथे यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणार्‍या शेतकरी बांधवाच्या संघर्षमय आंदोलनास पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीस…

Read More

जामनेर ः प्रतिनिधी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. डॉ. विजयेंद्र विश्वनाथ पाटील सहाय्यक प्राध्यापक मराठी यांचे ‘लोकरंगभूमी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन नुकतेच झाले. सदर प्रकाशन हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, प्रशांत पब्लिकेशन्सचे संचालक प्रदीप पाटील, उपप्राचार्य डॉ.आर.एस.खडायते यांच्या हस्ते झाले. ‘लोकरंगभूमी’ हे पुस्तक तृतीय वर्ष कला शाखेसाठी मराठी विषयांसाठी उपयुक्त आहे. त्याचसोबत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अक्षय घोरपडे यांनी केले. यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. विजयेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी पुस्तक लेखनाबद्दल शुभेच्छा देवून लोकरंगभूमी व आजचे विज्ञान युग…

Read More

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी   आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. यामुळे शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजीत मानसिक आरोग्य शिबिराचे उदघाटन जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण होते. प्रास्ताविकातून मनोविकार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे-पाटील यांनी तणावमुक्तीबाबतची माहिती दिली. याप्रसंगी पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ही बाब काळाची गरज आहे.…

Read More

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. ५७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या खराब फलंदाजीमुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली. ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला किमान तीनशेपार मजल मारता आली. इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवणार होती, पण इंग्लंडच्या कर्णधाराने तो पर्याय नाकारत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ…

Read More

पंढरपूर: भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांना काळे फासून साडी नेसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन करताना कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या रागातून शिवसैनिकांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपनं शुक्रवारी राज्यभर आंदोलन केलं होतं. पंढरपूरमध्येही निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाले आणि आता करोना होईल म्हणून घरात बसतात,’ असं कटेकर म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यावरून शिवसैनिकांमध्ये संताप होता.…

Read More