Author: saimat team

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी मतदार संघातील वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड व वढोदा वनक्षेत्रातील वनविभागाची तसेच सामाजिक वनिकरण अंतर्गत येणारी विविध विकास कामे गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे रखडलेली होती. प्रलंबित विकास कामांना तात्काळ मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा तसेच बहूप्रतिक्षेत असलेल्या वढोदा व्याग्र प्रकल्प अशा  प्रमुख मागण्यांसंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वनमंत्री राठोड यांनी मतदार संघातील विविध विकास कामे आणि व्याग्र प्रकल्प आदींबाबत अनुकूल असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदी उपस्थित…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राज्याचे राजकारण बदलतेय. महाविकास आघाडी पाय रोवतेय. हे सरकार टिकणार, चालणार आहे. कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवतोय. त्यांच्या अहंपणामुळे सरकार पडले.अद्यापही त्यांचा तो अहंमपणा सुटलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीत श्री.खडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी होते. जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, गफ्फारभाई मलिक, माजी आमदार अरुण पाटील, मनीष जैन, कल्पनाताई पाटील, अभिषेक…

Read More

मुंबई : प्रतिनिधी कोविडच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी असूनही जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील खेडी व भोकर या दोन गावांना जोडणार्‍या पुलाच्या कामांसाठी तब्बल १५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यान पूल बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. या अनुषंगाने कोविडची आपत्ती सुरू असतांनाही मंत्रालयात तीन उच्च स्तरीय बैठका झाल्या. यात जुलै महिन्यातील बैठकीत या पुलाच्या बांधकामाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत १५२ कोटी रूपयांच्या कामाला…

Read More

दिल्ली :-  राष्ट्रपती राम नाथ कोविंद 4 ते 7 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत कर्नाटक व आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. राष्ट्रपती 4 फेब्रुवारी, 2021 रोजी सायंकाळी बंगलोरला रवाना होतील, ते 5 फेब्रुवारी, 2021 रोजी बंगळुरूच्या येलहंका येथील हवाईदलाच्या तळावरील एअरो-इंडिया-21 च्या समारोप सोहळ्याला संबोधित करतील. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यांतील माडिकेरी येथे ते 6 फेब्रुवारी 2021 जनरल थिमय्या यांच्या वडिलोपार्जित जुन्या घरात केलेल्या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करतील. बेंगळुरू येथील  राजीव गांधी आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या वार्षिक पदवीदान सोहळ्याला ते 7 फेब्रुवारी 2021 रोजी उपस्थित राहतील. त्याच दिवशी नवी दिल्लीला परतण्यापूर्वी ते मदनपल्लीच्या सत्संग फाउंडेशनच्या आश्रमाला व आंध्र प्रदेशातील सादम येथील पिपल ग्रोव शाळेला भेट देतील.

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांचा शिवसेना पदाधिकारी व मुस्लिम समाजातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ढोल-ताशांच्या गजरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत मिरवणूक कालिंका माता मंदिराजवळून मार्केट यार्डमध्ये आली. यावेळी हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यांच्या समवेत आ. किशोर पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य पदमसिंग राजपूत, राजू राठोड, संपर्क प्रमुख सुनील पाटील, किशोर बारावकर, शरद पाटील, अविनाश कुडे, शिवनारायण जाधव, सुधाकर महाजन, अ.गणी…

Read More

जामनेर ः प्रतिनिधी महिलांनी दशसूत्री कार्यक्रम राबवून गट सक्षम करावेत व शाश्‍वत उपजीविका निर्माण कराव्या. ज्या वस्तू आपण शहरातून गावात मागवतो त्याच गावात कशा मिळतील व निर्माण होतील याकडे लक्ष द्यावे. जेणे करून गावांचा शाश्‍वत विकास होईल. तसेच महिलांनी एक पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मिती देखील करावी व ते गांडूळखत आपल्या स्वतःच्या शेतात तसेच उर्वरित खतही शेतकर्‍यांना विकून त्यातून पैसा कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकर यांनी यावेळी सांगितले. पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकर यांनी तालुक्याला भेट देऊन पाणी फाउंडेशनमध्ये काम करणार्‍या गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसी-आय) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अमळगाव येथील सारिका मंगेश झंवर हिने पहिल्याच प्रयत्नात ६० टक्के गुण मिळवून अमळगाव परिसरात पहिली महिला सीए होण्याचा मान मिळवला. सारिकाने मुंबई येथील सिडनॅम कॉलेजमध्येे ‘बी.कॉम’चे शिक्षण पूर्ण केले असून सीए परीक्षेची त्यादरम्यान ती तयारी करत होती. सारिकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमळनेर येथे पूर्ण केले होते. इयत्ता १० वीमध्ये ती ९५ टक्के गुण मिळवून डी.आर.कन्या शाळेतून द्वितीय क्रमाकाने उत्तीर्ण झाली होती. तर १२ वीला जळगाव येथील एम.जे.कॉलेजमध्ये ९१ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यात ती उत्तीर्ण झालेली होती. अमळगाव…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी तेली समाजाचा मेळावा शिर्डी येथे दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील राहता रोडवरील सिद्धसंकल्प लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील तेली समाजाच्या जास्तीत जास्त  समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे जळगाव जिल्हाध्यक्ष के.डी.चौधरी यांनी  केले. ते चोपडा येथे नुकत्याच घेण्यात आलेलया तेली समाजाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा म्हणजे तेली समाजाचा एक भव्य मेळावाच आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर उपस्थित राहणार आहेत. ही सभा समाजाच्या दृष्टीने…

Read More

मुक्ताईनगर ः प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक रेशन कार्ड लाभार्थी यांचे आधार लिंक इतर जिल्ह्यात झालेले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रारी व निवेदने देवूनही पुरवठा विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड काढताना अनेक अडचणी, आधार सीडिंग  तसेच स्वस्थ धान्य दुकानावर धान्य कमी मिळणे आदी तक्रारी व निवेदने देवूनही मुक्ताईनगरच्या तहसीलदार अडचणी सोडविण्यास सपशेल अपयशी ठरल्याने दिव्यांग व्यक्तींना शासकीय परिपत्रकानुसार स्वतंत्र लाभार्थी कार्ड बनविणे आणि विधवा महिलांचे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड बनविणे या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडीतर्फे संविधानिक मार्गाने शिवसेना स्टाईल प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाट, तालुका…

Read More

मुंबई :-  शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील नवीन कार्यालयाचे उद्‌घाटन आज वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 1995 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या उत्तर सरहद्दीवरील कुपवाडा येथे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झालेले कॅप्टन विनायक विष्णू गोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती गोरे यांनी आपला मुलगा शहीद झाल्यानंतर राज्यातील शाळाशाळांमध्ये जाऊन देशाच्या संरक्षणासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे म्हणून व्याख्यानाद्वारे युवकांचे प्रबोधन केले. श्रीमती गोरे यांची तब्बल 8 पुस्तके आणि विविध वर्तमानपत्रात जनजागृती करणारे लेख प्रसिद्ध आहेत. माहे जानेवारी, 2017 मध्ये बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. श्रीमती गोरे या पार्ले टिळक विद्यालयातून…

Read More