Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी मराठी प्रायोगिक रंगभूमी व एकूणच चळवळी लोप होण्याच्या काळात जळगाव सारख्या छोट्याशा शहरातून प्रायोगिक रंगभूमीला महाराष्ट्र भर आवाज देण्याचं काम परिवर्तन जळगाव करीत आहे हे अभिनंदनीय व अनुकरणीय असल्याचे मत साहित्य संस्कृतीचे अभ्यासक उल्हास दादा पवार यांनी काल पुणे येथे आयोजित परिवर्तन कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी लेखक सुधीर भोंगळे, प्रत्रकार विजय बाविस्कर, आशुतोष पोतदार, शुभांगी दामले,आयोजक अतुल पेठे व परिवर्तनच्या मंजुषा भिडे मंचावर उपस्थित होत्या. परिवर्तन कला महोत्सवाची सुरुवात ‘अमृता साहिर इमरोज’ या शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित नाटकाने झाली. अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित हे नाटक वास्तव व आभासी जग यांचं अत्यंत विहंगम…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील नवीन रायपूरला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाला वीज पुरवठा करणारी डिपी काढण्यात आली. यामुळे पुरेसा विद्युत पुरवठा होत नसल्याने रायपूर येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पुन्हा डीपी बसविण्यास वीज वितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात असून ग्रामपंचायत प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. रायपूर गावाला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाजवळच काही अंतरावर रायपूर येथे पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर आहे. तालुक्यातील रायपूर-कुसुंबा गावाला वीज पुरवठा करण्यासाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागूनच डीपी बसविण्यात आली होती. परंतु महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे व अडथळा ठरत असल्यामुळे ही डीपी…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव शहरातील वाहतूक समस्या अत्यंत गंभीर आहे .या बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी महत्वाच्या चौकात स्वयंचलित सिग्नल्स बसविण्यात आले आहेत.त्यातील जवळपास बहुतेक बंद अवस्थेत दिसून येतात.परिणामी वाहतूक नियंत्रणाचे काम स्वतः पोलिसांनाच करावे लागते.त्यात वेळेची बचत म्हणावी किंवा काही म्हणा,जळगाव वाहतूक पोलीस शाखेने वाहनात बसूनच वाहतूक नियंत्रित करण्याची अनोखी अन् काहीशी गमतीशिर पद्धत सुरू केली आहे. जळगाव वाहतूक पोलीस शाखेच्या या नव्या पद्धतीचा सुरुवातीस थोडाफार परिणाम जाणवला खरा,परंतु आता वाहतूक पोलिसांची ही पद्धत म्हणजे गमतीचा विषय म्हटली जात आहे .लोकांनी त्यास “उंटावरून शेळ्या हाकण्याचा “प्रकार असे नाव ठेवत या पद्धतीची खिल्ली उडवणे सुरू केले आहे. शहरातील प्रचंड वाहतूक,नागरिकांची…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिवरथ यात्रेसाठी चाळीसगाव येथून रवाना होणार्‍या दुर्ग सेवकांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी झेंडा दाखवून यात्रेचा काल रात्री शुभारंभ केला व सर्व दुर्गसेवकांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित असलेल्या या यात्रेला यश मिळो आणि महाराष्ट्रातील गड-किल्ले सुरक्षित राहावेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गड किल्ले संवर्धनकार्यावर अधिक भर देण्याचे देखील ठरविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाने, तालुका संघटक सुनिल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात असलेल्या खदानीत आव्हाणा रोडवरील सुदत्त कॉलनीतील रहिवासी महिलेने अचानक झोकून दिल्यामुळे काही काळ खळबळ उडाली. या महिलेने आत्महत्या करण्याचा तर प्रयत्न केला नाही, अशी शंका आल्यामुळे परिसरातील बांधकामावर वॉचमन असलेल्या एका व्यक्तीने खाली उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सदर महिलेला किरकोळ दुखापत झाली असून खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचारानंतर तीला मुलाने व नातेवाईकाने घरी आणले आहे. आज पहाटे सुदत्त कॉलनीतील रहिवासी महिला जयश्री रविंद्र पाटील (वय ३९) ही घरात दिसत नसल्यामुळे तिचा मुलगा नरेंद्र पाटीलने तिचा शोध सुरु केला व आपल्या नजीकच्या नातेवाईकांनाही कळविले. काही वेळाने आपली आई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ’फ्रंटलाईन’ योध्दांसाठी आजपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिली तर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुसर्‍या क्रमांकावर ’कोविशील्ड’ लस घेऊन दुसर्‍या टप्पयाचा प्रांरभ करुन कोरोना लसीकरण सुरक्षित असल्याचा संदेशही दिला. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी ’कोविशील्ड’ ही लस तयार झाली आहे. जिल्ह्यात ही लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात (१६ जानेवारीपासून) आरोग्य सेवकांना लस देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५४१ आरोग्य सेवकांना लस देण्यात आली आहे. तर शासकीय रुग्णालयात आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत…

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी येथील शिवसेना महिला आघाडीतर्फे पेट्रोल -डिझेल दरवाढ विरोधात काल जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील शिवसेना कार्यालयापासून बैलगाडीवर बसून तहसील कार्यालयापर्यंत प्रवास करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख अंजली नाईक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनिता किशोर पाटील, वैशाली सुर्यवंशी, प्रा.अस्मिता पाटील, मंदाकिनी पाटील,किरण पाटील, बेबा पाटील,सुशिला पाटील,जया पवार, शुष्मा पाटील, सुरेखा वाघ (भडगाव), उर्मिला शेळकेसह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरातील शिवसेना कार्यालयापासून महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध नोंदवित तहसिलदार कार्यालयात येऊन तहसिलदार कैलास चावडे यांना जाहिर निषेधाचे निवेदन…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे (आरटीओ) काल रात्री ९ ते १०.३० वाजेच्या दरम्यान ३१ लक्झरी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर तीन बसेस जप्त करण्यात आल्या. ही मोहीम राज्यभरात एकाच वेळी राबवण्यात आली. लक्झरी बसेसची साइज वाढवणे, टॅक्स न भरणे, फिटनेस सर्टिफिकेट नसणे आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. आरटीओ श्याम लोही यांच्या नेतृत्वाखाली वाहन निरीक्षक देशमुख यांच्यासह पथकाने मोहिम राबवली. यात प्रामुख्याने गुजरात राज्यात जाणार्‍या लक्झरींवर कारवाई करण्यात आली. यात जामनेर-सुरत या मार्गावरील १४-०५०२ या साईराम ट्रॅव्हल्स ,मुक्ताईनगर-अहमदाबाद या मार्गावरील शुभ ट्रॅव्हल्स ( जीजे ०५ एव्ही ८५०२) व शिव ट्रॅव्हल्स (जीजे ०१ डी झेड १५१५) या तीन लक्झरीतील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महावितरण कंपनीतर्फे वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार वीज ग्राहकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जळगाव परिमंडळ अंतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ४६२ वीज थकबाकीदार ग्राहकांना मेसेज, ई-मेलसह पत्राद्वारे या नोटीसा देण्यात आल्या आहेत. १५ दिवसांचा नोटीस काळ पूर्ण केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या ग्राहकांकडे १,३४१ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी थकीत आहे. कोरोना काळात थकलेल्या वीजबिल वसुलीच्या मोहिमेला महावितरणाकडून गती देण्यात आली आहेे. त्यामुळे ग्राहकांचे आधी टाळेबंदीने आणि आता वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडत असल्याने वसुलीचे पडसाद उमटू लागले आहे. विविध राजकीय पक्षांकडून या नोटीसी विरोधात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शनिवार १३ फेब्रुवारी रोजी जळगाव दौर्‍यावर येणार आहेत.सकाळी ११ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात …उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ या अभिनयांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव हा कार्यक्रम दि.१३ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील व…

Read More