आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात प्रतिमापूजन; श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पक्षाच्या आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा कार्यालयात जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रमोद पाटील व महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक भान जपत परिसरात तब्बल २१ वृक्षांची लागवड केली.
जयंतीचे औचित्य साधून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच श्रीराम माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे वाटप करून शैक्षणिक मदत देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, नियोजन व मनोगत जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन सर यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, ज्येष्ठ कार्यकर्ते विलास पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, माजी नगरसेवक राजू मोरे, माजी नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे, सुहास चौधरी, संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यालय मंत्री सतीश चव्हाण, फराह शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
