मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले.आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी आणि अभिनेत्री सुझान बर्नर्ट शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होते.ही बातमी ऐकून ती तातडीने परतली. रिपोर्टनुसार, ५८ वर्षीय अभिनेते स्वयंपाक घरात काम करत होते आणि त्याठिकाणी ते घसरले. अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुरुवातीला असे समोर आलेले की ते बाल्कनीजवळ काम करत होते आणि उंच इमारतीमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला मात्र आता समोर आले की, स्वयंंपाक घरात घसरुन पडले होते.
या घटनेनंतर पार कोलमडून गेलेल्या अभिनेत्री सुझानने अशी प्रतिक्रिया दिली की, माझं हृदय तुटलं आहे, माझा एक भाग निघून गेला आहे.अभिनेत्रीला अखिल यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागत आहे.अखिल यांची अशाप्रकारे एक्झिट तिच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांची ‘लायब्रेयियन दुबे’ ही भूमिका विशेष गाजली.