राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्री रेंजूषा मेननचा मृतदेह

0
1

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था

मनोरंजन विश्व हादरवणारी घटना सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी घडली.मल्याळम टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री रेंजूषा मेनन तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.३५ वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या श्रीकार्यम, तिरुअनंतपुरम याठिकाणी असलेल्या फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यामागचे कारण काय, अभिनेत्रीने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रेंजूषा मल्याळण मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखीचा चेहरा आहे.तिने अनेकदा चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. रेंजूषा शेवटचे ‘आनंदरागम’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘वरण डॉक्टरनू’ या मालिकेतही ती विनोदी भूमिका साकारत होती. तिने ‘एंटे माथावू’, ‘मिसेस हिटलर’ या मालिकांमधूनही लक्ष वेधून घेतले होते. मालिकांसोबतच ती ‘सेलिब्रिटी कुकरी शो’ ‘सेलिब्रेटी किचन मॅजिक’मध्ये स्पर्धक म्हणूनही दिसली होती. शिवाय अभिनेत्रीने ‘सिटी ऑफ गॉड’ आणि ‘मेरीकुंडोरू कुंजाडू’ या सिनेमातही काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here