Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shirur : शिरूर बायपास परिसरात एमडी विक्रीप्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात
    क्राईम

    Shirur : शिरूर बायपास परिसरात एमडी विक्रीप्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

    saimatBy saimatApril 13, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / शिरूर

    शिरूर बायपास परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६.९४ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

    ही कारवाई शनिवारी (दि. ११) अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान करण्यात आली. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ एमडी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आला.

    या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) तसेच बीएनएस कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांकडून सुरू आहे.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच पोलिस कर्मचारी तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर आणि नीरज पिसाळ यांनी सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Dombivali Crime : गाडी बाजूला घेण्याच्या वादातून कार चालक व मित्रावर दगडांनी प्राणघातक हल्ला

    April 12, 2026

    Nandurbar : डोक्यात वार करून तरुणाची निर्घृण हत्या

    April 12, 2026

    Jalgaon : कासमवाडी आठवडे बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.