Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव जिल्ह्यात १८८९ कुपोषित बालक; तर ७३२६ मध्यम कुपोषित
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात १८८९ कुपोषित बालक; तर ७३२६ मध्यम कुपोषित

    SaimatBy SaimatAugust 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    जिल्हाभरात प्रशासनाच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी सर्व विभागांचे २१ भाग केले असून एका वेळी चार विभागांची बैठक आयोजित करून त्य्ााच्या महिनाभरातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वच कामांचा यातून पाठपुरावा करणे सुलभ होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिऱ्यांनी पदभार घेऊन गुरूवारी एक महिना पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली कामे केली. याचा लेखाजोखा सर्व विभाग प्रमुखांना बोलवून सादर केला. यावेळी कुपोषणाबाबत त्यांनी खबरदारीचे उपाययोजना करण्याचे विभाग प्रमुखांना आदेश देऊन दर आठवड्याला तपासणी करण्याचे आदेश दिले.

    जिल्ह्यात मूबलक खत साठा उपलब्ध
    जिल्ह्यात पूर्वीचा १८ हजार मेट्रिक टन खत साठा होता. बुधवारी ३ हजार मेट्रिक टन गुरुवारी ३ हजार मेट्रिक टन असा ६ हजार खत साठा उपलब्ध झाला असून जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. कुठेही टंचाई नाही. टंचाईच्या अफवा आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    लम्पी रोगाने ५ तालुके बाधित; लसीकरण सुरू
    जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर, पारोळा येथे लम्पी रोगाने थैमान घातले आहे. यासाठी लसीकरण सुरू असून जिल्ह्यात येत्या आठवड्यात लसीकरण पूर्ण होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बाधित जनावरांची प्रकृती ठिक झाल्यावर किमान १० ते १५ दिवस त्यांना कामावर जुंपू नये, त्यांना विश्रांती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    कुपोषणाबाबत तातडीने उपाययोजना करा: जिल्हाधिकारी
    जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढ होत असून जिल्ह्यात तीव्र कुपोषित १८८९ बालके असून मध्यम कुपोषित ७३२६ बालके आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत एकूण २२ प्रकल्प व ३९४४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यापैकी १९ प्रकल्प हे ग्रामीण भागात आहेत. यात ३४३५ अंगणवाड्या आहेत. तर ३ शहरी प्रकल्पात ५०९ अंगणवाड्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील ३४३५ अंगणवाडी केंद्रात २ लाख ५७ हजार १३० बालके असून त्यापैकी १८८९ बालके अतितीव्र कुपोषित, तर ७३२६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत आहेत. तर उर्वरित २ लाख ४७ हजार ९१५ बालके सर्वसाधारण श्रेणीत आहेत.

    कुपोषणासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबवणार
    कुपोषण कमी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महिन्यात प्रत्येक अंगणवाडी केंद्र, शाळा, आरोग्य केंद्र तसेच प्रत्येक गावात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.