यावलला तालुका वंचित बहुजन आघाडीची बैठक उत्साहात

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यावल येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची बैठक मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी यावल वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान मेघे होते. बैठकीत अनेकांसह महिलांनीही पक्षात प्रवेश केला.

बैठकीत मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील होत्या. यावेळी बैठकीचे प्रमुख विषय त्यांनी मांडले. त्यात जि.प., पं.स.गट, गणात बैठकीचे आयोजन करणे, बुथ कमिटी व सर्कल आढावा तसेच पक्ष बांधणी, नवीन शहर कार्यकारिणी व ग्रामीण शाखा बांधणे, गाव तिथे शाखा, घर तेथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करणे, वंचित बहुजन आघाडीच्या पक्षात ओबीसी व मुस्लिम आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक महत्त्वाचे पदे देण्याबाबत, जे पदाधिकारी पक्षाला वेळ देऊ शकत नाही, पक्षाचे काम करत नाही अशा पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देण्यात येईल. उपस्थित असलेल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी एकच नारा दिला. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी, यावल तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत किरण तायडे चितोडा, राजेश वानखेडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यात मोहम्मद शफी, तैपूर कादरी, भूषण साळुंखे, राजेश गवळी, संतोष तायडे किनगाव, भूषण तायडे सांगवी, अमोल तायडे सांगवी, किरण तायडे सांगवी, किरण मेढे सांगवी, ईश्‍वर दादा कासारखेडा, सचिन बहारे निधुर, आत्माराम कोळी, मनोज सोनवणे, शुभम भालेराव, ईश्‍वर युवराज तायडे, सुरेश मधुकर तायडे, कुर्बान तडवी, विकी उल्हास, चंद्रकांत काशिनाथ यांच्यासह महिलांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here