लोहारा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

0
2

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी संचलित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन भीमराव शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून गणित तज्ज्ञ तथा माजी मुख्याध्यापक नाना लामखेडे उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे सचिव सागरमल जैन, सहसचिव यु.यु.पाटील, युवा नेते स्नेहदीप गरुड, संस्थेचे संचालक डॉ.राजेंद्र शेळके, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्‍वासराव पाटील, उपाध्यक्ष ए.ए. पटेल, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ.देवेंद्र शेळके, उत्तम शेळके, सुरेश चौधरी, डिगंबर चौधरी, रमेश शेळके, कैलास चौधरी, अमृत चौधरी, संजय पाटील, पत्रकार दिलीप चौधरी, ज्ञानेश्‍वर राजपूत, गजानन क्षीरसागर, हेमंत गुरव, श्री.लिंगायत, पी.व्ही.जोशी, ज्ञानेश्‍वर माळी, श्रीराम कलाल, संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, हरिप्रसाद महाराज, संस्थेचे प्रेरणास्थान आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, स्वागत गीत सादर केले.

प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर कशाप्रकारे उपक्रम राबविले याविषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांमधून वाय.पी.वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच स्नेहदीप गरुड, कैलास चौधरी, कृषीभूषण विश्‍वासराव पाटील, सचिव सागरमल जैन, नाना लामखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव शेळके यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांनी जीवनाच्या परीक्षेला कशा सामोरे जावे, याविषयी माहिती दिली. हा कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु. डी.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बी.एन.पाटील तर आभार पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here