गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये ‘सीएनसी प्रोग्रामिंग ॲन्ड मशिनिंग’वर कार्यशाळा

0
18

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये ‘सीएनसी प्रोग्रामिंग ॲन्ड मशिनिंग’वर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. किशोर महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.हेमंत इंगळे, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा.कैलास मखिजा (यंत्र विभाग प्रमुख, तंत्रनिकेतन) सर्व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. किशोर महाजन यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेझेंटेशनमध्य सीएनसीमध्ये वापरण्यात येणारे जी कोड व एम कोड या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर काही ड्रॉइंग्स विद्यार्थ्यांना दाखवून जी कोड व एम कोड या ठिकाणी कसे अप्लाय करता येतील, यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी ‘सीएनसी लेथ दि सीएनसी मायलिंग’ या संदर्भात विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी ‘हँड्स ऑन प्रॅक्टिस’ घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः ॲक्रेलिक मटेरियलपासून सीएनसी प्रोग्राम तयार करून जॉब बनविले. विद्यार्थ्यांना स्वतः या गोष्टी करायला मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे उत्सुकता जाणवली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. पंकज बोंडे, प्रा. प्रसाद मराठे यांनी केले. सूत्रसंचालन नीलम नारखेडे हिने केले.

सीएनसी मशिनिस्ट, प्रोग्रामरवर मार्गदर्शन

प्रास्ताविकात प्रा. तुषार कोळी यांनी सीएनसी मशिनिस्ट आणि प्रोग्रामर या दोन बाबींवर प्रकाश टाकताना म्हणाले की, बाहेरील इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तसेच सीएनसी प्रोग्रामर एरोस्पेस इंजिनिअरिंग, ऑटोमोटिव्ह सेक्टर, मेडिकल तसेच एनर्जी आणि अजूनही इतर क्षेत्रांमध्ये गरजेचे असतात. तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज करताना त्यांनी विद्यार्थ्यांना अशा विविध कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here