सुप्रिम कॉलनीतील गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात हातभट्टीची बेकायदेशीर दारू विक्रीसह वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. आझाद बहादुर भाट (वय ४१, रा. रामदेवबाबा मंदिराजवळ, सुप्रिम कॉलनी) असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणारा आझाद बहादुर भाट याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहे. असे असतांनाही त्याच्यात कोणतीही सुधारणा होत नव्हती. या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांना अहवालाचे अवलोकन करून प्रस्तावाला मंजूरी मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मंजूरी देवून गुन्हेगार आझाद बहादुर भाट याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सैय्यद, सुधिर साळवे, पो.कॉ विशाल कोळी, राहूल रगडे, महिला पो.कॉ. हसीना तडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पो.हे.कॉ. सुनील दामोदरे, जयंत चौधरी आणि पंडीत पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here