भाजपचे ‘मिशन ४००’ इंडिया आघाडी मोडून काढेल?

0
13

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने आगामी

लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला जास्तीचा वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारदेखील आगामी काही दिवसात लोकप्रिय घोषणा करण्याच्या तयारीत आहे. बुधवारीच केंद्र सरकारने प्रत्येक अपघात ग्रस्ताला कॅशलेस उपचार सुविधांची घोषणा केली आहे, हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपकडे सर्वाधिक लोकसभेच्या जा

गा आहेत. त्या जागा कायम ठेवण्याची तयारी भाजपने केली आहे. याशिवाय, ‘मिशन ४००’ गाठण्यासाठी भाजपला देशभरातील सर्वच राज्यांमध्ये जागा जिंंकणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक अत्यंत निर्मेळ बहुमताने जिंकायची असेल तर प्रत्येक प्रभाव असलेल्या आणि नसलेल्या जागांवर देखील जिंकण्याच्या तयारीने काम करावे लागणार आहे, याची जाणीव भाजप श्रेष्ठींना असल्यामुळे त्यांनी अनेक निष्क्रीय खासदारांचे तिकीट कापण्याचे नियोजन केले आहे.
लोकसभा निवडणुकीला जवळपास चार ते पाच महिने उरले आहेत. नुकताच निकाल लागलेल्या या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६५ जागा आहेत, त्यापैकी सध्या भाजपकडे ६१ जागा आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दि

ल्ली, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये १९३ जागा आहेत. या राज्यांतील १७७ जागांवर भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत. भाजपसमोर या राज्यांतील आपल्या जागा टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर संख्याबळ वाढवण्याचे आव्हान आहे. या ११ राज्यांमध्ये जागा वाढण्यास फारसा वाव नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकू शकेल असे गृहित धरले तरी पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये १८ जागा, महाराष्ट्रात २३ जागा आणि गुजरातमध्ये सर्व २६ जागा जिंकल्या. त्या कायम ठेवण्यासाठी प.बंगाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीसाठी भाजपला जोर लावावा लागणार आहे.

‘मिशन ४००’ ची वाट अधिक बिकट
मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी या%