नेपाळ दुर्घटनेवर संवेदनशील फुंकर अन्‌ रक्षाताईंच्या तत्परतेची पंतप्रधान दखल घेतात तेव्हा…

0
44

‘रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम…!’ मथळ्याखाली प्रसिध्द केलेला मजकूर समाज घटकात प्रचंड प्रमाणात व्हायरल

नेपाळमधील बस दुर्घटनेत जिल्ह्यातील ज्या २५ जणांनी जीव गमावला. त्यांचे कुटुंबिय विरहाच्या दु:खातून अद्यापही सावरलेले नाही. मात्र, रविवारी जळगावमधील ‘लखपती दीदी’ समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या दुर्घटने दुर्घटनेबद्दल ज्या शब्दात पिडा व्यक्त केली, त्यातून त्यांच्यातील संवेदनशिलतेचे आणि लोकांप्रतीच्या आत्मनियतेचे दर्शन घडले. त्या दुर्घटनेविषयी बोलतांना ते पुढे म्हणाले, दुर्घटनेची माहिती मिळताच नेपाळ सरकारशी संपर्क साधण्यात आला आणि आमच्या केंद्रीयमंत्री रक्षाताई यांना तातडीने नेपाळला जाण्याचे सांगितले. दुर्घटनेतील मृतदेह वायुसेनेच्या विमानाने येथे आणण्यात आले आणि जे जखमी आहेत. त्यांच्यावर चांगल्या पध्दतीने उपचार सुरु आहेत. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला श्री.मोदींनी ‘इसी धरती की संतान बहन रक्षाताई खडसे’ असा उल्लेख करुन जणू ताईंच्या तत्परतेची एका प्रकारे दखल घेतली असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. रक्षाताईंच्या तत्परतेसंदर्भात जिल्ह्यातील विविध समाजघटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. विशेषत दै. ‘साईमत’मध्ये ‘रक्षाताईंच्या तत्परतेस सलाम…!’ या मथळ्याखाली प्रसिध्द केलेला मजकूर समाज घटकात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून रक्षाताईंनी ज्या जबाबदारीने आपले कर्तव्य निभावले. त्याबद्दल समाजात चांगला संदेश तर गेलाच पण त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही उत्सफूर्त भावना व्यक्त केल्या गेल्या. अशा असंख्य प्रतिक्रिया आज उमटल्या. त्यातील उदाहरण म्हणून वरणगाव-फुलगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी यांची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे.

श्री. चौधरी म्हणाले, दुसऱ्या देशातून मृतदेह तातडीने येथे आणणे आणि तेथे (नेपाळ) जखमी असलेल्यांसाठी तेवढ्याच तत्परतेने औषधोपचाराची सुविधा करणे हे खूप मोठे काम आहे. जनतेचा लोकप्रतिनिधी कसा असावा, हे रक्षाताईंच्या रुपाने अनुभवास आला. नेपाळचे गृहमंत्री पूर्णवेळ रक्षाताई बरोबर होते. त्यांनाही ताईंच्या संवेदनशिलतेबद्दल अप्रुप वाटले.

-सुरेश उज्जैनवाल, कार्यकारी संपादक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here