२५ हजारांचा सूर्य :- खेळ रंगांचा

0
34
२५ हजारांचा सूर्य - खेळ रंगांचा-www.saimatlive.com

 

सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे मनात विचार आला, आता जाऊन पाहिलंच पाहिजे. रूम पासून प्रदर्शन जवळच असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी प्रदर्शन पाहायला गेलो. अनेक वेगवेगळी आणि आकर्षक चित्र त्या ठिकाणी लागलेली दिसली. प्रत्येक चित्र एक खूप मोठा अर्थ घेऊन डोळ्यासमोर येत होते. त्या चित्रातून चित्रकार आपलं मत आणि आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता. जशी लेखकाची ताकद लेखणी असते तशीच चित्रकाराची ताकद पेन्सिल असते. तिथे काही लोक चित्रावरून किंमत ठरवत होते. पण मला वाटतं कलेमध्ये भाव करणं हे कलाकारासाठी अपमानास्पद असतं. पण हे त्यांना कोण सांगणार, असो…

चित्र पाहत असताना एका चित्राने मला ४५ मिनिटे खेळवून ठेवलं. ते चित्र होतं एकाच सूर्याचं. प्रत्येक रंगाचा वापर करत या सूर्याचे चित्र चित्रकाराने रेखाटले होते. यातून चित्रकाराला सांगावसं वाटत असेल की, आपल्याला जगात दिसणाऱ्या प्रत्येक रंगामागे सूर्याचा खूप मोठा हात आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकात सूर्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. सूर्याच्या बाजूला असलेली संख्या आणि आकृत्या धार्मिकतेसोबतच वैज्ञानिकदृष्ट्या सूर्याचे महत्त्व असावेत असं मला वाटतं. हे चित्र काढणाऱ्या चित्रकाराचं नाव रोहन राठोड. मी चित्र इतका निरखून पाहतोय म्हणून त्याने मला सहजच विचारणा केली, तू पण चित्रकार आहेस का..?‌ मी म्हटलं मला चित्रकलेची खूप आवड आहे, फार नाही पण काही प्रमाणात चित्रातलं मलाही कळतं, आणि म्हणूनच या चित्रात मला खूप काही दिसतंय. रोहन दादा ने मला चित्रातले अनेक पैलू समजावून सांगितले. आणि मग लक्षात आलं, हा सूर्य 25 हजारांचाच का..?

स्वप्निल अनंत काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here