जिल्ह्यात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत राबविले विविध उपक्रम

0
19

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

साईमत चमुकडून

भारतीय संविधान दिनानिमित्त विविध संस्था, संघटना, सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी दिवसभर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात विविध स्पर्धा, रॅली, मार्गदर्शन, व्याख्यान, शिबिर आदी उपक्रमांचा समावेश होता. संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

जामनेरात रॅलीसह कायदेविषयक शिबिर

जामनेर: तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल दिन आणि संविधान दिनानिमित्त जामनेरातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह जामनेर न्यायालयातून राजमाता जिजाऊ चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. शिबिराला ॲड.एस.व्ही.फाशे, श्रीमती पालवे, केंद्रप्रमुख सुरवाडे, श्री.माळी, पी.व्ही.सूर्यवंशी, दि.न.चामले, मुख्याध्यापक महाजन यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.बी.एम.चौधरी, सचिव ॲड.एम.बी.पाटील, सरकारी वकील ॲड.कृतिका भट, ॲड. अनिल सारस्वत, श्री व सौ.चंदले, ॲड. डी.व्ही.राजपूत, न्यायालयीन कर्मचारी, शिक्षक तसेच पोलीस कर्मचारी, इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.

पाचोरा न्यायालयात शिबिर

पाचोरा : येथील न्यायालयात तालुका विधीसेवा समिती आणि पाचोरा तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे औचित्य साधुन शिबिराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर न्या.जी.बी.औंधकर होते. शिबिरात ॲड. गौरव पाटील यांनी संविधान दिनाविषयी तर ॲड. अंकुश कटारे यांनी बालकांसाठी बालकस्नेही विधीसेवा आणि बालकांचे संरक्षण विषयावर मार्गदर्शन केले. तसेच आय.डी. बी. आय. बँक शाखा-पाचोरा येथील शाखा व्यवस्थापक प्रदीप हर्डीकर यांनी सायबर गुन्हे विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात न्या. जी.बी.औंधकर यांनी भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन केले. यशस्वीतेसाठी जी. बी. औंधकर, सह. न्यायाधीश एस.व्ही.निमसे, दुसरे सह न्यायाधीश श्रीमती जी.एस.बोरा, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण बी.पाटील, उपाध्यक्ष ॲड. मंगेश गायकवाड, सचिव ॲड. निलेश सूर्यवंशी, सहसचिव ॲड. अंबादास गिरी, सर्व विधिज्ञ, पाचोरा पोलीस स्टेशन, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पाचोरा एमएम महाविद्यालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

पाचोरा : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी उपस्थितांना संविधान गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनी संविधानाचे नियमित वाचन करून संविधानाची मूल्य समजून ती अंगीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन डॉ.के.एस. इंगळे यांनी केले. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भि. ना. पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, ॲड. महेश पवार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. शरद पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. शुभम राजपूत, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. अमित गायकवाड, गोपाल चौधरी, मच्छिंद्र जाधव, ज्योती जाधव, घनश्याम करोशिया, संतोष महाजन, प्रवीण खेडकर, सतीष पाटील, यश पाटील, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सत्रासेन आश्रमशाळेत राबविले विविध उपक्रम

चोपडा : तालुक्यातील सत्रासेन येथील आश्रमशाळेत ऑगस्ट महिन्यात स्थापन केलेल्या संविधान मंचामार्फत संविधान दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यानिमित्त निबंध, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा होत्या. यावेळी माध्यमिकचे शिक्षक संजय शिरसाळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक जगदीश महाजन यांनी संविधान दिनाबद्दल मनोगत व्यक्त करुन संविधान जनजागृती तसेच संविधान दिनाबाबत महत्त्व स्पष्ट केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भादले, उपाध्यक्ष धनंजय भादले, सचिव ज्ञानेश्वर भादले यांनी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले. यशस्वीतेसाठी संविधान मंचाचे सदस्य भालचंद्र पवार, विकास पाटील, मनोज महाजन, रेलसिंग पावरा, विजय सैंदाणे, छायाबाई बाविस्कर, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच गजानन पाटील, नरेंद्र देसले, मनोज पाटील, कैलास महाजन, प्रकाश महाजन, अधिक भादले, सुधाकर महाजन, दीपमाला भादले, मनिषा जाधव, अजय पावरा, सरोजनी चौधरी, वैशाली अजगे, शितल पाटील, उदय वानखेडे, विकास कोळी, अनिल राणे, कल्पना पाटील, मनोज साळुंखे, पवन पावरा, संजीवनी पावरा, कविता भादले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन योगेश पाटील तर झुलाल करनकाळ, नरेंद्र महाजन यांनी आभार मानले.

चाळीसगाव महाविद्यालयात संविधानवर मार्गदर्शन

चाळीसगाव : येथील बी.पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, उपप्राचार्या डॉ. पूनम निकम, उपप्राचार्य ए. आर. मगर, प्रा. मुकुंद अहिरे, उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव, एन.एस.एस. विभागप्रमुख डॉ. रवींद्र बोरसे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रभाकर पगार यांच्यासह इतर प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी मनोगतात संविधानातील कायद्याचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविकात प्रा. मुकुंद अहिरे यांनी आपल्या संविधान दिवसानिमित्त मार्गदर्शन आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र बोरसे तर प्रा.डॉ. दीपक पाटील यांनी आभार मानले.

देवळी आश्रमशाळेत संविधान दिन साजरा

चाळीसगाव : तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी सतिष पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजू पाटील, साहेबराव निकम उपस्थित होते. त्यांनी दीप प्रज्ज्वलन करून प्रतिमा पूजन केले. शाळेतील शिक्षक संदीप देशमुख, भाग्यश्री राठोड, विद्यार्थी साधना पावरा यांनी संविधानाविषयी माहिती दिली. तसेच दादासाहेब दाभाडे यांनी संविधानाचे वाचन केले. प्रत्येक वर्गात वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले.संविधानाचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.

बहुजन पवार कर्मचारी संघटनेतर्फे पेढे वाटप

चाळीसगाव : येथील विभागीय कार्यालय महावितरणच्या बहुजन पवार कर्मचारी संघटनेमार्फत पेढे वाटून संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान आपल्यासाठी किती महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, याबद्दल सविस्तर चर्चा विचारविनिमय करून प्रास्ताविकात बहुजन पवार कर्मचारी संघटनेचे झोन कार्याध्यक्ष शाम खंडू ठाकूर, केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे प्रत्येक नागरिकांच्या जीवनात आवश्यक आहे. भारतीय संविधान जडणघडणीपासून तर माणसाच्या सर्व कायदेशीर, सामाजिक, राजकीय, धार्मिक सर्व बाबींसाठी भारतीय संविधान मोलाचे आहे, असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बहुजन पावर कर्मचारी संघटनेचे सर्कल अध्यक्ष दीपक पवार, दिनेश पाटील, सचिन जाधव, प्रसाद गवळी, शहीद पिंजारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी बहुजन पवार कर्मचारी संघटनेच्यामार्फत संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन ‘संविधानाचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.बहुजन पवार कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय पदाधिकारी, झोन पदाधिकारी व सर्कल पदाधिकारी तसेच विभागीय कार्य पदाधिकारी यांना रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या. सागर चौधरी उर्फ सोमा टायगर यांनी बहुजन पवार कर्मचारी संघटनेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

धरणगाव महाविद्यालयात संविधान दिनासह शहिदांना श्रद्धांजली

धरणगाव : येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संविधान दिनाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय शिंगाणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आर.पी. चौधरी, पर्यवेक्षक डी. डी. पाटील, कार्यक्रमाधिकारी डॉ. अभिजीत जोशी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संविधान ग्रंथांचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू भगिनी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे प्रकट वाचन केले. प्रा. मोहन लहासे यांनी उपस्थितांना संविधानाबद्दल मार्गदर्शन तसेच संविधानाची शपथ दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ. उदय जगताप यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विविध उदाहरणासह स्पष्ट केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम. बी.एस.सी.च्या द्वितीय सत्राला भारतीय संविधान हा विषय सर्वांना अनिवार्य केला आहे. तसेच २६ नोव्हेंबर रोजी भारतावर झालेला भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले मेजर उन्नी कृष्णन, पोलीस अधिकारी हेमंत करकरे, इतर हुतात्मे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रास्ताविक डॉ. अभिजीत जोशी, सूत्रसंचालन डॉ. दीपक बोंडे तर आभार प्रा. एस.झेड.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here