पक्षाचे दोन उमेदवार अन्‌ पाच अपक्षांचे डिपॉझिट जप्त

0
20

चोपडा विधानसभा मतदारसंघात ‘नोटाला’ तिसरी पसंती

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

चोपडा विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची ३२ हजार ३१३ मते मिळून मोठा विजय मिळविला आहे. त्यांनी प्रभाकर सोनवणे यांचा दारुण पराभव केला. चंद्रकांत बळीराम सोनवणे (शिवसेना) – एक लाख २२ हजार ८२६ (विजयी), प्रभाकर गोटु सोनवणे(उबाठा) ९० हजार ५१३ (पराभूत) असे मतदान झाले होते. उर्वरित सात उमेदवारांमध्ये एकालाही चोपडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी पसंती दिली नाही. तिसऱ्या क्रमांकाची पसंती ‘नोटाला’ दिली. नोटाला दोन हजार ४२० मते मिळाली.

बसपाचे युवराज बारेला यांना एक हजार २९५, भारत आदिवासी पार्टीचे सुनील तुकाराम भील यांना एक हजार ४०१ तर पुढील अपक्ष अमित सिराज तडवी यांना ५९८, अमीनाबी तडवी यांना ३२४, बाळू साहेबराव कोळी यांनी प्रभाकर सोनवणे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेत पाठिंबा दिला होता. परंतु मतपत्रिकेवर त्यांचे नाव असल्याने त्यांनाही ३३१ मते मिळाली आणि संभाजी सोनवणे यांना ५६५ तर हिरालाल कोळी यांना दोन हजार ११८ असे मते मिळाली. बसपाचे युवराज बारेला आणि भारत आदिवासी पार्टीचे सुनील तुकाराम भील यांच्यासह पाच अपक्षांचे ठरलेल्या निकर्षापेक्षा कमी मते मिळविल्याने डिपॉझिट जप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here