उद्धव ठाकरे म्हणजे रोजची नाटक कंपनी…

0
3

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाइव्ह

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. आहे. शिवसेनेतील बंडखोरीलाही उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेच (Aaditya Thackeray) जबाबदार असल्याची भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) हे सातत्याने करत आहेत.

काय नाटक आहे… लोकांना कामाशी घेणं देणं असतं, ढोंग नाटकं काही ठराविक दिवसांपुरतेच चालतात. उद्धव ठाकरे म्हणजे रोजची नाटक कंपनी झाली आहे, काम काही नाही फक्त फालतुगिरी, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे शिवसेनेला पुन्हा उभारण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. मात्र तुमची ताकद मला हवी आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here