Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Two Brothers Killed : जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार
    जळगाव

    Two Brothers Killed : जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ ठार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 4, 2025Updated:June 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रुग्णालयात नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली गर्दी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरात जुन्या महामार्गावरील निमखेडी शिवारात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा सख्ख्या भावांचा बुधवारी, ४ जून रोजी पहाटेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला. अपघातात ज्ञानेश्वर दगडू शिवदे आणि प्रमोद दगडू शिवदे असे मयत झालेल्या भावांची नावे आहेत. दरम्यान, एकाच अपघातात दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शहरात हळहळ व्यक्त होत असून शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

    शहरातील जुन्या महामार्गावरील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने ज्ञानेश्वर शिवदे आणि प्रमोद शिवदे यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना शिंदे गटाच्या महिला शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती तर प्रमोद हे त्यांचे दीर होते. ज्ञानेश्वर आणि प्रमोद शिवदे हे दोघेही बंधू पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. दररोजप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा अपघात घडला.

    अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार

    अपघातानंतर मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.