रथोत्सवातील शेवटचे वहन, रामभक्तांचा उत्सव शिगेला

0
22

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

आजचे वहन आहे रामभक्त मारुतीरायाचे. जय वीर हनुमान बळ शक्ती सामर्थ्य व बुद्धिमत्ता यांचा सुरेख समन्वय असलेले बजरंग बली. गावागावात पारा पारावर विराजमान होऊन सर्वांनी शक्तिशाली बना असा संदेश देणारे मारुतीराय. रामभक्त हनुमान सदैव रामसेवेत सादर असणारा रामदूत सेवक मारुतीराय. भक्तीचा शक्तीचा युक्तीचा बुद्धीचा सेवेचा आदर्श पाठ घालून देणारा, सगळ्या भक्तांचे भूषण असणारा मारुती हनुमंत. म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,

शरणं शरणं हनुमंता । तुज आलो रामदूता ॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥
शूर आणि धीर । स्वामी कार्यापै सादर ।
तुका म्हणे रुद्रा । अंजनीच्या कुमरा ॥

पवन पुत्र वीर हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक. हनुमान बालपणीच सूर्यास्त फळ समजून त्याच्यावर झेपावणारा मारुती. लंका दहन करणारा, सीतेचा शोध घेणारा, ज्यांचे हृदयात सदैव श्रीराम असणारा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, वाढता वाढता वाढे भेदिलें शून्य मंडळा. द्रोणागिरी आणून लक्ष्मणास सहाय्य करणारा मारुती. आज मारुतीरायाचे मस्तकावर विराजमान होऊन आलेत प्रभू श्रीराम तर चला मग आरती घेऊन त्यांच्या स्वागताला…..

आजच्या पानसुपारीचे मानकरी ….

जय हनुमान मित्र मंडळ, बदाम गल्ली, जुने जळगाव
महर्षी वाल्मिक सांस्कृतिक मित्र मंडळ, वाल्मिक नगर.
रोहिदास शांताराम ठाकरे, शिवशंकर नगर, मोहन टॉकीजजवळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here