चित्रप्रदर्शनातून मांडला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

नव्या पिढीसाठी देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आला आहे. विद्यार्थी, पालकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन देशाचा इतिहास समजून घ्यावा. जो इतिहास समजून घेईल, तो इतिहास निर्माण करू शकतो. या विचाराने जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, संघटना प्रतिष्ठान यांनी चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन खा.उन्मेश पाटील यांनी केले. चाळीसगाव बस स्थानकात सोमवारी, १४ ऑगस्ट रोजी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय- जळगाव यांच्या विद्यमाने मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन खा.उन्मेश पाटील यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय संचार ब्यूरो प्रबंधक संतोष देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ, प्रचार अधिकारी प्रदीप पवार, भाजपाचे जिल्हा सचिव ॲड.प्रशांत पालवे आदी उपस्थित होते. सुरूवातीला शाहीर महर्षी आत्माराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र’ गीत सादर केले.

यावेळी खा.उन्मेश पाटील यांच्या हस्ते आणीबाणीतील सुरेश शेटे, त्रिदल सेनेचे गोकुळ फौजी पाटील, शेतकरी नेते आर.के.पाटील, बचत गट, पोस्ट विभाग यांसह विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर उन्मेशद पाटील यांनी सर्वांना पंचप्राण शपथ दिली. यावेळी ‘भारत माता की जय’ घोषणेने बस स्थानक दणाणले होते. कार्यक्रमात केंद्र शासनाचे ‘९ नऊ वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण’ या पुस्तिकेचे विमोचन व वाटप करण्यात आले.

तीन दिवस सुरु राहणार चित्रप्रदर्शनी
चित्रप्रदर्शनी तीन दिवस सुरु राहणार आहे. डिजिटल प्रदर्शनीला भेट द्यावी, या चित्रप्रदर्शनीला २५ हजार विद्यार्थी, पालक नागरिक, प्रवाशी भेट देतील. चित्रप्रदर्शनीच्या ठिकाणी तहसील कार्यालयाचे वोटिंग जनजागृती, एकात्मिक बाल विकास, पोस्ट विभाग, माहितीपर लावण्यात आले आहेत. यशस्वीतेसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, बापू पाटील, किरण कुमार यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन पत्रकार मुकेश पवार, प्रास्ताविक संतोष देशमुख तथा आभार केंद्रीय संचार ब्यूरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here