जळगाव ः प्रतिनिधी
विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ नाव धारण करताच केंद्रातील मोदी सरकार डगमगायला लागले आहे.केंद्र सरकार हालायला लागले आहे. मला माझ्या जळगावच्या महापौर आणि उपमहापौरांसह इतर सहकाऱ्याचा अभिमान आहे.पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे हवेत,असे म्हणत माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभारलात हे ठीक आहे, पण कामाची उंची गाठा ना,पुतळ्याची उंंची ठीक आहे,कामाची उंची कधी गाठणार? असा खोचक प्रश्न विचारुन, वल्लभभाईंनी जशी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाहीय.मणिपूरसारख्या ज्वलंत प्रश्नावर चुप्पी साधणारे हे कसले पोलादी पुरूष, हे तर तकलादू पुरूष”, असे टिकास्रही ठाकरेंनी पंतप्रधानांवर डागले.
जळगाव शहरातील मनपा प्रांगणातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण शिवसेना(उबाठा)पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मानराज पार्क परिसरातील भव्य प्रांगणात झालेल्या प्रचंड वचनपूर्ती सभेत त्यांनी भाजपा,शिवसेना शिंदे गट व पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र
सोडले.
आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान लढत दुपारी ३ वाजता सुरु होणार होती.त्यापुर्वीच झालेल्या या जाहिर सभेत उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करतांना वचनपूर्ती सभेत शाब्दीक चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.त्यास हजारो शिवसैनिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत,कोण आला रे कोण आला,शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणाही दिल्या.
आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता आली काय गेली काय? मी सत्तेसाठी धडपडत नाही. देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्न मला पडत नाही. जागे करण्याचे काम मला वंश परंपरेने आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँंंग्रेस होईल.२५ वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही तशीच कांँग्रेससोबत जावून शिवसेनाची कांँग्रेस होऊ देणार नाही,पण भाजपा कमळाबाईची पालखी देखील वाहणार नाही,अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी केली.
तरी हिंदूंना आक्रोश
मोर्चा काढावा लागतो
उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा कांँग्रेसचे सरकार होते तेव्हा ‘हिंंदू खतरेमें’ अशा घोषणा देत होते. आता यांचे नऊ वर्षे सरकार आहे तरी यांना कश्मीरमधील हिंदू पंडीतांना परत आणता आले नाही.आता तर यांना यांचे सरकार नऊ वर्षे असताना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागतोय,हे दुर्दैव असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
जरांंगेंना भेटायला वेळ नाही
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मराठा आंंदोलनात मनोज जरांगे आंंदोलनाला बसले आहेत. त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही परंतु मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा ‘जालनावाला’ घडविला आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
भाजपने माझे वडीलही चोरले
भाजपने सरदार पटेल यांंचा पुतळा उभारला.त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांंंना चोरले.अगदी माझे वडील देखील त्यांनी चोरले. भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका त्यांनी केली.
हे कसले पोलादी पुरूष,
हे तकलादू पुरूष”
“१७ सप्टेंबरला मराठा स्वातंत्र्यमुक्ती दिन आहे. त्यावेळी जिनांचे निधन झाले होते. त्यामुळे अनेकजण म्हणाले की, ही कारवाई पुढे ढकला. पण वल्लभभाई बोलले की, नाही आजच कारवाई होणार.त्यांनी फौजा घुसवल्या आणि मराठवाडा अभिमानाने भारतात सामील करून घेतला. आज आम्ही पुतळे उभारतोय जरूर. वल्लभभाईंनी जशी मराठवाड्यात कारवाई केली तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाहीय.हे कसले पोलादी पुरूष, हे तकलादू पुरूष”, असे टिकास्रही ठाकरेंनी पंतप्रधानांवर डागले.