भ्रष्टाचार विरोधी समिती, त्रिमूर्ती एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिन साजरा

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील घाटरोड येथे मौलाना अबु कलाम आझाद लायब्ररी येथे भ्रष्टाचार विरोधी समिती, त्रिमूर्ती एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक दिनाचे महत्व पटवून देण्यात आले. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष भाईसाहब शेख अलाउद्दीन दादा मागील चाळीस वर्षांपासून शिक्षण जागृत मोहीम १५ जून ते ५ सप्टेंबरपर्यंत राबवित असतात. यावेळी उपस्थित शिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी हाजी गुलाम अहमद, अब्दुल गनी अफसर, गुलाम सर, ज्ञानेस दिवाण (प्रभारी मुख्याध्यापक), इम्रान गफ्फार खान, मोहसीन रशीद खान, दिनेश सर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शेख दिलफिरोज (सरपंच, पिंपरखेड), रवी मोरे (उपसरपंच, पिंपरखेड), अनिल पेटे, तय्यब भाई होते. यावेळी अफसर सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन रफीक सर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन मुंतजिम शेख (मॉन्टीभाई), अवेस खान यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here