मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray)हा मोठा धक्का असून पक्ष संघटना उभी करण्यासाठी ते पुन्हा मैदानात उतरले आहे. यासाठी तळागाळातील शिवसैनिकांची त्यांना साथ हवी. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर त्यांनी भेटण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांना ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर ह्रदयविकाराच्या झटका आला. यानंतर काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या निधनानंतर शहापुरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तसेच त्यांच्या निधनाने पक्षाच्या गोटात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माहितीनुसार , पक्षाची बैठक सुरू असतानाच भगवान काळे यांना अस्वस्थ वाटू लागले.कलानगर येथील रुग्णालयात नेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.