Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Sharad Patil Of Umalaya Dies : उमाळ्याचे शरद पाटील यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
    जळगाव

    Sharad Patil Of Umalaya Dies : उमाळ्याचे शरद पाटील यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 12, 2025Updated:June 12, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाहन चालक फरार, उमाळा गावात पसरली शोककळा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    तालुक्यातील उमाळा येथील रहिवासी शरद समाधान पाटील (वय अंदाजे ३५) यांचा शेतातून दुचाकीवरून (क्र.एमएच १९ एबी३९१२) घरी परत येत असताना बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेनंतर गावातील पोलीस पाटील रंगनाथ बिऱ्हाडे, राहुल बिऱ्हाडे यांनी प्रसंगावधान राखून शरद पाटील यांना स्वतःच्या वाहनातून जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे उमाळा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, शरद पाटील यांच्या निधनामुळे गावाने एक प्रामाणिक आणि मेहनती युवक गमावला असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

    अपघाताची माहिती मिळताच माजी सरपंच योगेश खडसे आणि उमाळा विकास सेवा संस्थेचे चेअरमन अनिल खडसे यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करुन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. ही घटना जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, पोलीस अज्ञात वाहनासह चालकाचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.