Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»एलएलबीच्या विद्यार्थ्यांचे स्वखर्चाने स्वयंप्रेरित अनोखे मतदार जागृती अभियान
    चाळीसगाव

    एलएलबीच्या विद्यार्थ्यांचे स्वखर्चाने स्वयंप्रेरित अनोखे मतदार जागृती अभियान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 10, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    येथील उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील एलएलबीच्या विद्यार्थ्यांनी एका कारवर रंगीबेरंगी स्वरूपात शत प्रतिशत ‘मतदान-देश का सन्मान’, ‘ना नशे से, ना नोट से, देश की किस्मत बदलेगी तो वोट से’, ‘वोट करो भाई वोट करो’, सीमापार दुश्‍मन पर चोट करो’, ‘कामाला लागा-मतदान करा’, ‘लग्न टाळा, साखरपुडा टाळा, आळस टाळा, मतदान करा’, ‘खुद मतदान करो, औरों से मतदान कराओ’, ‘मतदान म्हणजे राष्ट्रसेवा’, ‘मतदान म्हणजे समाजसेवा’ अशा विविध घोषणांचे स्टिकर चिटकवून मतदान जनजागृती रथ सजविला आहे. या रथावर एक ध्वनीक्षेपक(स्पीकर) बसविलेला आहे. १५ एप्रिलपासून दररोज साधारण १० गावांतील चौकाचौकात आणि गल्लीगल्लीत जाऊन रथ मतदार जागृती करीत आहे. हा रंगीत संगीत रथ जिथे जाईल तिथे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वखर्चाने व स्वयंप्रेरणेने सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांच्या संकल्पनेतून खान्देशातील कवी मनोहर आंधळे यांनी रचलेले व नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी गायिलेले मतदार जागृती गीत गावोगावी ऐकविले जाते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार व जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने वंचित पाडे, तांडे येथे जनजागृती रथाची यात्रा सुरू आहे. यापूर्वी जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक गावांमध्ये रथाने जनजागृती केली आहे. जाईल तेथे हा मतदान जनजागृती रथ आकर्षण ठरत आहे. नागरिक उत्सुकतेने विविध घोषवाक्य वाचत व ऐकत आहेत. जनजागृतीद्वारे प्रत्येकाने स्वत: मतदान करावे, इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करावे, असे वारंवार प्रेरीत केले जात आहे.

    विधी महाविद्यालयाचे रावसाहेब राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भरत ससाणे, अक्षय रिठे, आनंद पाटील या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या नयना झोपे (महाजन), अनुजा पाटील, पूजा व्यास, विद्या बोरनारे, ऐश्‍वर्या आठवले, शैलेष नागला या प्राध्यापकांचे व विनोद धांडे, प्रदीप महाजन या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच इतरही काही मित्र मंडळींचे सहकार्य लाभत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Chalisgaon : शिवापूर शिवारात दुहेरी आत्महत्येची दुर्दैवी घटना

    March 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.